-
ऋजुता लुकतुके
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ नागपूरमध्ये पोहोचला तेव्हा एक मजेशीर प्रसंग घडला. विमानतळावरून संघाची बस हॉटेलपाशी पोहोचली ती कडेकोट पोलीस बंदोबस्तात. खेळाडू बसमधून उतरून हॉटेलमध्ये निघाले असताना तिथे तैनात पोलिसांनी एका खेळाडूला अडवलं. तू संघाबरोबर काय करतोयस असा प्रश्न त्याला विचारून त्याला हॉटेलमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. ही व्यक्ती आपण संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये असल्याचं सांगत होती. पण, पोलीस ऐकत नव्हते. त्यांना तो एक चाहता असावा असंच वाटलं. (Ind vs Eng, ODI Series)
(हेही वाचा- China कडून अमेरिकी वस्तूंवर १५ टक्के कर लावण्याची घोषणा)
ही व्यक्ती म्हणजे संघाचा थ्रो-डाऊन तज्ज रघू होता. संघात फलंदाजांचा तो लाडका आहे. त्यांना ज्या प्रकारच्या चेंडूवर सराव करायचा आहे, तसा सराव रघू फलंदाजांबरोबर करतो. क्रिकेट जगतात रघूची नक्कीच ओळख आहे. कारण, भारतीय संघाबरोबर तो गेले काही वर्षं काम करतोय. पण, पोलिसांनी त्याला ओळखलं नाही. हा व्हीडिओ क्षणार्धात व्हायरल झाला आहे. (Ind vs Eng, ODI Series)
GOAT Raghu of Indian cricket team was denied entry by Nagpur police 😂
Nagpur police guarding Rohit Sharma’s boys too strictly 😎 pic.twitter.com/iko9TTD0hP
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) February 4, 2025
भारतीय संघातील काही खेळाडू ही सगळी मजा बघताना दिसतात. भारतीय संघ दोन दिवसांच्या शिबिरासाठी नागपूरला पोहोचला आहे. रोहित, विराट, शुभमन आणि रिषभ हे टी-२० मालिका खेळत नसलेले खेळाडू दोन दिवस आधीच इथं पोहोचले आहेत. भारतीय संघाचा पहिला एकदिवसीय सामना नागपूरमध्येच ६ फेब्रुवारीला होणार आहे. टी-२० मालिका ४-१ अशी जिंकल्यानंतर भारतीय संघासमोर आता ५० षटकांच्या सामन्याचं आव्हान आहे. आणि इथेही सगळ्यांच्या नजरा रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर असणार आहेत. (Ind vs Eng, ODI Series)
(हेही वाचा- SSC Exam : कॉपीमुक्त अभियानासाठी सरकारचा मोठा निर्णय ; 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर असणार ड्रोन कॅमेऱ्यांची नजर)
फॉर्मशी झगडणाऱ्या या स्टार खेळाडूंना एकदिवसीय क्रिकेटमध्ये फॉर्म गवसेल अशी आशा आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ लगेचच चॅम्पियन्स करंडकासाठी दुबईला रवाना होणार आहे. (Ind vs Eng, ODI Series)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community