-
ऋजुता लुकतुके
इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ नागपूरमध्ये तयारी करत आहे. आणि नुकत्याच आटोपलेल्या टी-२० मालिकेत लक्षवेधी कामगिरी करणारा डावखुरा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती भारतीय संघात दाखल झाला आहे. ६ फेब्रुवारीला या मालिकेला सुरुवात होणार आहे. आणि त्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि संघ दोन दिवसांच्या शिबिरासाठी नागपूरमध्ये जमला आहे. वरुण चक्रवर्ती संघाच्या ताफ्यात थेट शामील झाला आहे. खरंतर एकदिवसीय संघात वरुणचा आधी समावेश नव्हता. पण, टा-२० मालिकेतील त्याचा फॉर्म पाहता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्याला एकदिवसीय संघातही शामील करून घेतलं आहे. (Ind vs Eng, ODI Series)
(हेही वाचा- China कडून अमेरिकी वस्तूंवर १५ टक्के कर लावण्याची घोषणा)
गोलंदाजीची लय सापडलेली असताना वरुणला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर ठेवू नये तसंच वरुणने नेट्समध्ये रोहित, विराट आणि रिषभलाही फलंदाजीचा सराव द्यावा असे दोन हेतू यामागे आहेत. वरुणने इंग्लंडविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांत मिळून १४ बळी मिळवले. यात दुसऱ्या सामन्यात तर त्याने ५ बळी टिपण्याची किमया केली होती. भारतीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिलने वरुण संघात सहभागी झाला असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. म्हणजेच तो निवडीसाठी उपलब्ध असेल. (Ind vs Eng, ODI Series)
For ending the series with an impressive 14 wickets, Varun Chakaravarthy is the Player of the Series 👏
Scoreboard ▶️ https://t.co/B13UlBNLvn#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank | @chakaravarthy29 pic.twitter.com/tVaMGvFKj3
— BCCI (@BCCI) February 2, 2025
३३ वर्षीय वरुण चक्रवर्तीने गेल्या हंगामात आयपीएल स्पर्धाही गाजवली होती. कदाचित या मालिकेत तो एकदिवसीय पदार्पण करू शकतो. अशीही शक्यता आहे की, चॅम्पियन्स करंडकासाठीच्या संघात त्याचा समावेश सध्या नसला तरी इथून पुढे तो होऊ शकतो. १२ फेब्रुवारी ही स्पर्धेसाठी संघात बदल करण्याची शेवटची तारीख आहे. तो पर्यंत जसप्रीत बुमराच्या तंदुरुस्तीचा अहवालही बीसीसीआयला मिळणार आहे. त्याचप्रमाणे वरुण चक्रवर्तीचाही संघात समावेश होऊ शकतो. तसं झालं तर कुलदीप यादव किंवा वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एकाला बाहेर बसावं लागू शकतं. (Ind vs Eng, ODI Series)
(हेही वाचा- SSC Exam : कॉपीमुक्त अभियानासाठी सरकारचा मोठा निर्णय ; 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर असणार ड्रोन कॅमेऱ्यांची नजर)
भारतीय संघ चॅम्पियन्स करंडकापूर्वी इंग्लंड विरुद्ध येत्या ६, ९ आणि १२ तारखेला नागपूर, कटक आणि अहमदाबाद इथं तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ पुढील प्रमाणे आहे, (Ind vs Eng, ODI Series)
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, के एल राहुल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद शामी, हर्षित राणा व वरुण चक्रवर्ती
हेही पहा-
Join Our WhatsApp Community