-
ऋजुता लुकतुके
भारताने टी-२० मालिका ४-१ ने जिंकल्यानंतर आता वेळ झाली आहे ती भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेची. संघाचं नेतृत्वही पुन्हा एकदा रोहित शर्माकडे जाईल. आणि विराट कोहली, यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, रिषभ पंत हे खेळाडूही संघात परततील. सध्या भारतीय संघ नागपूरात एकत्र यायला सुरुवात झाली आहे. विराट, रोहित, शुभमन आणि रिषभ नागपूरमध्ये सोमवारीच दाखल झाले आहेत. चॅम्पियन्स करंडकासाठी निवड झालेला भारतीय संघच या मालिकेतही खेळणार आहे. फक्त जायबंदी जसप्रीत बुमराचा बदली खेळाडू म्हणून हर्षित राणाची संघात निवड झाली आहे. आणि बुमराच्या दुखापतीवर निर्णय होत नाही तोपर्यंत तो भारतीय संघाबरोबर असणार आहे. तसंच तो निवडीसाठीही उपलब्ध असेल. (Ind vs Eng, ODI Series)
(हेही वाचा- नागपुरातील मैदानांच्या विकासासाठी राज्य शासनाकडून १५० कोटी देणार ; CM Devendra Fadnavis यांची घोषणा)
६ तारखेला नागपूरच्या कामटा इथं असलेल्या स्टेडिअममध्ये पहिला एकदिवसीय सामना होईल. संघाचा एकत्र सराव मंगळवारपासून सुरू होईल. (Ind vs Eng, ODI Series)
#WATCH | Maharashtra: Indian Captain Rohit Sharma, Virat Kohli, Shreyas Iyer, Yashasvi Jaiswal, Shubman Gill and others arrive at Nagpur airport for the 1st ODI match against England, on 6th February.
India clinched the five-match T20 series 4-1 against England. pic.twitter.com/4vQjLfdDtH
— ANI (@ANI) February 2, 2025
चॅम्पियन्स करंडकापूर्वी भारतीय संघासाठी ही सरावाची शेवटची संधी आहे. त्यामुळे या मालिकेला महत्त्व आहे. मालिकेतील पुढील दोन सामने ९ आणि १२ फेब्रुवारीला अनुक्रमे कटक आणि अहमदाबाद इथं होणार आहेत. सर्व सामने दिवसरात्र आणि भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होतील. चॅम्पियन्स करंडकासाठी संघ बदल करण्याची अंतिम मुदतही १२ फेब्रुवारीपर्यंत आहे. (Ind vs Eng, ODI Series)
(हेही वाचा- Maharashtra Kesari Kusti : वादांनी रंगलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विजेता )
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, विराट कोहली, के एल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, हर्षित पटेल, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग (Ind vs Eng, ODI Series)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community