Ind vs Eng Ranchi Test Preview : भारताला मालिका जिंकण्याची संधी, तर इंग्लंडचा बरोबरीचा अखेरचा प्रयत्न

इंग्लिश संघाला तिसऱ्या कसोटीपासून बॅझ-बॉल रणनीतीवर खूप काही ऐकून घ्यावं लागलं आहे. 

183
Ind vs Eng Ranchi Test Preview : भारताला मालिका जिंकण्याची संधी, तर इंग्लंडचा बरोबरीचा अखेरचा प्रयत्न
  • ऋजुता लुकतुके

इंग्लिश संघ या कसोटी मालिकेसाठी भारतात आला तेव्हा हा नवखा संघ भारतासमोर अजिबात टिकणार नाही, असंच जाणकारांना वाटत होतं. कारण, संघातील तीनही फिरकी गोलंदाज टॉम हार्टलली, शोएब बशीर आणि रेहान अहमद आंतरराष्ट्रीय क्रिकेट (International cricket) खेळलेलेच नव्हते. आणि जो रुट, बेन स्टोक्स सारखे कसलेले फलंदाज असेल तरी भारतीय फिरकी तीन दिवस खेळून काढणं त्यांनाही कठीणच जाणार होतं. (Ind vs Eng Ranchi Test Preview)

पण, आश्चर्य म्हणजे बेन स्टोक्सच्या या नवख्या संघाने हैद्राबाद कसोटी चक्क २७ धावांनी जिंकून दाखवली. दुसऱ्या डावात हार्टलीने ६ बळीही टिपले. तेव्हा वाटलं बॅझ-बॉल या कसोटीची रंगत वाढवणार. दुसरी कसोटी भारताने जिंकली असली तरी ती रंगतदार झाली. पण, तिसरी राजकोट कसोटी भारताने पूर्ण वर्चस्व गाजवून ४३४ धावांनी जिंकली आणि संशयाचे सगळे ढग विरले आहेत. उलट बॅझ-बॉल रणनीती दीर्घ काळ आणि खेळातील खऱ्या कौशल्याला आव्हान देऊ शकेल का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. (Ind vs Eng Ranchi Test Preview)

कारण, आता भारतीय संघाचा (Indian team) आत्मविश्वास इतका वाढलाय की, जसप्रीत बुमरा हा भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज चौथ्या कसोटीत विश्रांती घेणार आहे. आणि गरज पडली तरच पाचव्या कसोटीसाठी त्याला बोलावण्याची भाषा बीसीसीआय (BCCI) करत आहे. खरंतर बुमरानेच या मालिकेत सर्वाधिक १७ बळी टिपले आहेत. पण, मोठा हंगाम पाहता, त्याला विश्रांतीचीही गरज आहे. (Ind vs Eng Ranchi Test Preview)

विराट कोहली, के एल राहुल ही कसोटी खेळणार नाहीएत. पण, याचीही भारतीय संघाला (Indian team) काळजी नाहीए. तर दुसरीकडे, चारी मुंड्या चीत झालेल्या इंग्लिश संघाला मालिकेत बरोबरीची आशा म्हणून कर्णधार बेन स्टोक्सला गोलंदाजी करायला लावायची वेळ आलीय. तो पूर्णपणे तंदुरुस्त नसताना. (Ind vs Eng Ranchi Test Preview)

अर्थात, राजकोट कसोटीने दिलेला हा विश्वास भारतीय संघाला मैदानात सार्थ करून दाखवावा लागणार आहे.

(हेही वाचा – Coastal Road : कोस्टल रोडच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त सापडला ? कधी येणार मुंबईकरांच्या सेवेत ?)

हा आहे सध्याचा दोन्ही संघातील फरक

के एल राहुल अजून पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे रजत पाटिदारला आणखी एक संधी मिळेल. सर्फराझ पहिल्याच कसोटीत संघात रुळला आहे. त्यामुळे मधल्या फळीची फारशी चिंता भारतीय संघाला (Indian team) नाही. उलट प्रमुख फलंदाजांच्या अनुपस्थितीत नवीन खेळाडूंनी चांगली कामगिरी करून दाखवली याचा अभिमानच कर्णधार रोहित शर्माला आहे. यशस्वी जयस्वाल सलामीला कमाल करून दाखवतोय. (Ind vs Eng Ranchi Test Preview)

अश्विन, कुलदीप आणि जडेजा हे फिरकी त्रिकुटही जम बसवून खेळतंय. बुमराच्या अनुपस्थितीत सिराज आणि दुसऱ्या तेज गोलंदाजाची मात्र कसोटी लागणार आहे. सिराज सातत्यपूर्ण नाही. तर मुकेश कुमारने रणजी सामन्यात १० बळी घेतले असले तरी दुसऱ्या कसोटीत मिळालेल्या संधीचा त्याला फायदा उचलता आला नव्हता. मुकेश की नवखा आकाशदीप असा प्रश्न रोहित आणि राहुल द्रविड यांना नक्की पडला असणार. (Ind vs Eng Ranchi Test Preview)

इंग्लंडसमोरचे प्रश्नही जास्त आहेत आणि संभ्रमही. बेन डकेट आणि क्रॉली यांनी सातत्याने करून दिलेली चांगली सुरुवात सोडली तर फलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी कुणीही केलेली नाही. ऑली पोप पहिल्या कसोटीतील १९६ धावांनंतर तलवार म्यान करून बसलाय. जो रुटला म्हणावा तसा फॉर्म गवसलेला नाही. जॉनी बेअरस्टो पूर्णवेळ फलंदाज म्हणून खेळत असतानाही धावा करत नाहीए. दुसऱ्या डावांत भारतीय खेळाडूंनी ज्या खेळपट्टीवर ४ बाद ४३० धावसंख्या रचली, तिथेच इंग्लिश संघ मात्र १२४ धावांवर सर्व बाद झाला. हा सध्याचा दोन्ही संघातील फरक आहे. आणि तोच इंग्लिश संघाला पुसायचा आहे. (Ind vs Eng Ranchi Test Preview)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.