Ind vs Eng, T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतून पंत, जयसवाल यांना वगळल्यामुळे टीका 

Ind vs Eng, T20 Series : २२ जानेवारीपासून इंग्लंड विरुद्धची मालिका सुरू होत आहे

49
Ind vs Eng, T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतून पंत, जयसवाल यांना वगळल्यामुळे टीका 
Ind vs Eng, T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतून पंत, जयसवाल यांना वगळल्यामुळे टीका 
  • ऋजुता लुकतुके

इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड शनिवारी झाली आहे. १५ जणांच्या संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव असेल तर अक्षर पटेल या संघाचा उपकर्णधार आहे. पण, या संघातून यशस्वी जयसवाल, रिषभ पंत आणि शुभमन गिल या नेहमीच्या यशस्वी खेळाडूंना वगळण्यात आलं आहे. संघ निवड जाहीर करताना, या तिघांना वगळल्याचं निवड समितीने स्पष्ट केलं आहे. पण, या निर्णयावर माजी खेळाडूंनी टीका केली आहे. (Ind vs Eng, T20 Series)

(हेही वाचा- संतूर वाद्याला लोकप्रियता मिळवून देणारे प्रसिद्ध संगीतकार Pandit Shivkumar sharmaयांच्याविषयी तुम्हाला माहिती आहे का ?)

खासकरून रिषभ पंत आणि यशस्वी जयसवाल यांना वगळण्याचा निर्णय माजी सलामीवीर आकाश चोप्राला रुचलेला नाही. ‘या संघात दुसरा यष्टीरक्षक म्हणून ध्रुव जुरेल आहे. पण, रिषभ पंतचं नाव नाही. हे खूपच आश्चर्यकारक आहे. ध्रुव चांगला खेळाडू आहे. पण, टी-२० संघात त्याला स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण, त्याने या प्रकारात अजून म्हणावं तसं कसब दाखवलेलं नाही. मग ज्याची निवडच होणार नाही, असा खेळाडू संघात का घ्यायचा. मूळात तो रिषभ पंतला पर्याय कसा काय ठरू शकतो? हा निर्णय मला तरी रुचलेला नाही,’ असं आकाशने आपल्या युट्यूब वाहिनीवर बोलून दाखवलं. (Ind vs Eng, T20 Series)

रिषभ पंत हा या पिढीतील एक हिरा आहे, असं आकाशचं मत आहे. भारतीय संघ स्थित्यंतराच्या पर्वातून जात असताना, खेळाडूंना वगळलं असेल तर त्यांच्याशी संघ प्रशासनाने योग्य संवाद ठेवला पाहिजे, असंही आकाशने बोलून दाखवलं. ‘यशस्वीचं नाव या संघात नाही. कदाचित ते त्याला चॅम्पियन्स करंडकासाठी राखून ठेवत असतील. आणि त्यापूर्वी एकदिवसीय मालिकेत तो खेळेल. पण, तरीही या संघात तो हवाच होता. अभिषेक शर्माला ११-१२ सामन्यांत संधी मिळाली आहे. पण, त्याने फारसं काही करून दाखवलेलं नाही. अशावेळी यशस्वी संघात हवाच होता,’ असं चोप्रा म्हणाला. (Ind vs Eng, T20 Series)

(हेही वाचा- Ratnagiri Bus Accident: रत्नागिरीत एसटी बसचा भीषण अपघात; बस दरीत कोसळून झाडात अडकली, धरणात पडता पडता वाचली)

संघ बांधणीवरही आकाशने टीका केली आहे. संघात ४ फिरकीपटू आणि दोनच सलामीवीर आहेत याकडे त्याने बोट दाखवलं. ‘दक्षिण आफ्रिकेविरुद्धही संघात दोनच सलामीवीर होते. आताही तसंच केलंय. मालिका ५ सामन्यांची आहे. एखादा आजारी पडला, तर कोण सलामीला येणार? तिलक वर्मा किंवा वॉशिंग्टनला ती जबाबदारी पार पाडावी लागेल. त्यापेक्षा दुसरा सलामीवीरच घ्यायला हवा होता. यशस्वीची जागा कोणी नाही घेऊ शकत,’ असं शेवटी आकाश चोप्रा म्हणाला. (Ind vs Eng, T20 Series)

भारत आणि इंग्लंड दरम्यानची टी-२० मालिका २२ जानेवारीपासून सुरू होत आहे. आणि कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई इथं टी-२० सामने होणार आहेत. (Ind vs Eng, T20 Series)

(हेही वाचा- Maha Kumbh Mela 2025 : प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला सुरुवात; १ कोटी भाविक करणार अमृतस्नान)

इंग्लंड विरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ — सुर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, नितिश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, महम्मद शामी व अर्शदीप सिंग  (Ind vs Eng, T20 Series)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.