Ind vs Eng, T20 Series : टी-२० मध्ये संजू सॅमसनचं यष्टीरक्षक, कर्णधार सूर्याने केलं स्पष्ट 

Ind vs Eng, T20 Series : चॅम्पियन्स करंडकासाठीच्या संघातून संजूला वगळण्यात आलं आहे

37
Ind vs Eng, T20 Series : टी-२० मध्ये संजू सॅमसनचं यष्टीरक्षक, कर्णधार सूर्याने केलं स्पष्ट 
Ind vs Eng, T20 Series : टी-२० मध्ये संजू सॅमसनचं यष्टीरक्षक, कर्णधार सूर्याने केलं स्पष्ट 
  • ऋजुता लुकतुके

रिषभ पंतने भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यापासून संघात यष्टीरक्षकाच्या जागेसाठी कधी नव्हे एवढी चुरस निर्माण झाली आहे. खासकरून टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत भारताने जितेन शर्मा, ध्रुव जुरेल, ईशान किशन आणि आता संजू सॅमसन असे चार महत्त्वाचे पर्याय अलीकडच्या ३ वर्षांत वापरून पाहिले. पण, यातील संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत लागोपाठ दोन शतकं ठोकून बहार उडवून दिली. आणि त्यानंतर यष्टीरक्षक सलामीवीर म्हणून आपली जागा जवळ जवळ पक्की केली आहे. (Ind vs Eng, T20 Series)

(हेही वाचा- ED सारख्या तपास यंत्रणांनी कायद्याच्या कक्षेत काम करावं; Bombay High Court ने ईडीला ठोठावला 1 लाखाचा दंड)

असं असतानाही चॅम्पियन्स करंडकाच्या संघ निवडीत त्याच्या नावाचा विचार झाला नाही. म्हणजे निवड समितीने के एल राहुल आणि रिषभ पंत यांच्या नावाला पसंती दिली. पण, त्यावर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी दिलेलं स्पष्टीकरण असं होतं. ‘संघात १५ खेळाडू निवडायची संधी असताना किती जणांना घेणार? आता संघाची गरज बघून हे पंधरा जण निवडले आहेत. संजूला वगळलेलं नाही,’ असं आगरकर यांनी बोलून दाखवलं होतं. (Ind vs Eng, T20 Series)

चॅम्पियन्स करंडक ही एकदिवसीय स्पर्धा आहे. पण, टी-२० मध्ये अजूनही संजू सॅमसन हाच संघासमोरचा पहिला यष्टीरक्षणाचा पर्याय आहे, असं आता संघ प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने तसं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. ‘संजूने आपली क्षमता शेवटच्या ८-१० सामन्यांत दाखवून दिली आहे. त्यामुळे सध्या आमच्यासमोर तोच पहिला पर्याय आहे. रिषभ पंत टी-२० संघातही सध्या नसल्यामुळे त्याचा विचार करण्याचा प्रश्नच नाही. आणि संजू हाच टी-२० मधील यष्टीरक्षक फलंदाज असेल. दोन्हीत सातत्यपूर्ण कामगिरी तो करेल याची मला खात्री आहे,’ असं सूर्यकुमार स्पष्टच म्हणाला.  (Ind vs Eng, T20 Series)

 सूर्यकुमारच्या बोलण्यातून काही गोष्टी स्पष्ट होत आहेत. ध्रुव जुरेलला आणखी काही दिवस यष्टीरक्षणाचा सक्षम पर्याय म्हणून वाट बघावी लागेल. तर फेब्रुवारीत एकदिवसीय मालिका सुरू होईल तेव्हा रिषभ पंत यष्टीरक्षक – फलंदाज म्हणून पुन्हा संघात येईल. आणखी एक गोष्ट सूर्यकुमारने स्पष्ट केली. आगामी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. आणि त्यासाठी संघ बांधणी आताच सुरू झाली आहे. (Ind vs Eng, T20 Series)

(हेही वाचा- Malegaon येथे बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना बनावट जन्मदाखले; एसआयटीकडून छाननी सुरु)

त्यामुळे सध्या उपलब्ध पर्यायांची चाचपणी करून एक संघ सुनिश्चित करणं ही सध्या सूर्यकुमार यादव, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांची जबाबदारी आहे. (Ind vs Eng, T20 Series)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.