Ind vs Eng Test Series : तिसऱ्या कसोटीत ध्रुव जुरेलला संधी मिळण्याची शक्यता

भरतला आतापर्यंत ७ आंतरराष्ट्रीय कसोटींमध्ये संधी मिळाली आहे. त्यात फलंदाजीत त्याने फारसा प्रभाव दाखवलेला नसल्याने भरतवर संघ प्रशासन नाराज आहे.

221
Ind vs Eng Test Series : तिसऱ्या कसोटीत ध्रुव जुरेलला संधी मिळण्याची शक्यता

ऋजुता लुकतुके

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत (Ind vs Eng Test Series) यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला (Dhruv Jurel) पदार्पणाची संधी मिळू शकते. उर्वरित कसोटी सामन्यांसाठी संघाची निवड झाल्यानंतर आता संघ राजकोटमध्ये पुढील कसोटीसाठी एकत्र आला आहे. तिथे हीच चर्चा रंगते आहे. सध्या मालिकेत १-१ अशी बरोबरी आहे. १५ तारखेपासून तिसरी कसोटी सुरू होणार आहे.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी दम देताच राऊतांनी गुंडांसोबतचे फोटो टाकणे केले बंद; काय म्हणालेले मुख्यमंत्री?)

भरतला आतापर्यंत ७ आंतरराष्ट्रीय कसोटींमध्ये संधी मिळाली आहे. त्यात फलंदाजीत त्याने फारसा प्रभाव दाखवलेला नसल्याने भरतवर संघ प्रशासन नाराज आहे. ‘भरतने आतापर्यंत मिळालेल्या संधीचा फायदा उचललेला नाही. त्याची फलंदाजीत तर तो अपेक्षेपेक्षा कमी पडलाच आहे, शिवाय यष्टीरक्षणही खूप खास झालेलं नाही. दुसरीकडे जुरेलकडे प्रतिभा आहे आणि त्याचा दृष्टिकोणही सकारात्मक आहे,’ असं टाईम्स वृत्तसमुहाने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. (Ind vs Eng Test Series)

सरासरीही २० च्या खाली – 

भरतला या मालिकेत २ कसोटींमध्ये खेळण्याची संधी मिळाली. पण, यात त्याने ४ डावांमध्ये ९८ धावा केल्या आहेत त्या २३ धावांच्या सरासरीने. तर एकूण ७ कसोटींमध्ये त्याच्या नावावर फक्त २२१ धावा जमा आहेत. सरासरीही २० च्या खाली आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय कसोटींत त्याच्या नावावर अर्धशतकही नाही. (Ind vs Eng Test Series)

(हेही वाचा – Vice President Jagdeep Dhankhar : नारी शक्तीच्या माध्यमातूनच विकसित भारताची पुढील वाटचाल)

४६ धावांच्या सरासरीने ७९० धावा –

याउलट ध्रुव जुरेलची कामगिरी पाहिली तर १५ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये त्याने ४६ धावांच्या सरासरीने ७९० धावा केल्या आहेत. यात १ शतक तसंच ५ अर्धशतकं जमा आहेत. २२ वर्षीय जुरेलने अलीकडेच इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध ५० आणि दक्षिण आफ्रिकेच्या अ संघाविरुद्ध ६९ धावांची खेळी केली होती. तसंच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडूनही तो प्रभावी ठरला होता. त्यामुळे भारताचा व्यस्त आंतरराष्ट्रीय कार्यक्रम पाहता आगामी काळात जुरेल हाच भारतीय संघात सर्व प्रकारात ‘लंबी रेसका घोडा’ ठरू शकेल, असं संघ प्रशासनाला वाटतं. (Ind vs Eng Test Series)

जसप्रीत बुमराला विश्रांती दिली जाणार ?

दरम्यान, सध्याचा व्यस्त कार्यक्रम पाहता, उर्वरित तीन कसोटींपैकी एका कसोटीसाठी जसप्रीत बुमराला विश्रांती दिली जाऊ शकते. भारतीय संघ राजकोटमध्ये जिंकला तर रांची कसोटीतच बुमराला विश्रांतीसाठी संघाबाहेर ठेवलं जाऊ शकतं. आणि तसं झालं तर या मालिकेत आकाश दीपलाही खेळण्याची संधी मिळू शकेल. आकाश दीपचा गोलंदाजीचा वेग हा मुकेश कुमारपेक्षा जास्त आहे. (Ind vs Eng Test Series)

(हेही वाचा – Indian Air Force Academy : भारतीय वायुसेना अकादमीतील 5 महिला अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी कथा)
रवींद्र जाडेजा आणि चेतेश्वर पुजारा यांचा सत्कार होणार –

पुढील राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवशी रवींद्र जाडेजा आणि चेतेश्वर पुजारा या स्थानिक खेळाडूंचा सत्कार करण्याचा सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा मानस आहे. आणि त्यांनी बीसीसीआयकडे तशी परवानगी मागितली आहे. (Ind vs Eng Test Series)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.