- ऋजुता लुकतुके
इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत भारतीय संघाने (Indian team) १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यानंतर पुढील कसोटी सामना १५ फेब्रुवारीला राजकोट इथं होणार आहे. या आणि त्या पुढील चौथ्या कसोटीसाठी विराट कोहली (Virat Kohli) उपलब्ध होणार नाही, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. त्याचवेळी दुखापतीमुळे दुसरी कसोटी खेळू न शकलेले के एल राहुल आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) नेमके किती तंदुरुस्त आहेत यावरही प्रश्नचिन्ह आहे. (Ind vs Eng Test Series)
पण, बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत उपचार घेत असलेल्या रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) इन्स्टाग्रामवर दोन शब्दांत एक संदेश लिहिला आहे. आणि त्यातून आपले चाहते आणि संघ प्रशासनाला त्याने आश्वस्तच केलं आहे. भारतीय निवड समिती तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ (Indian team) निवडणार आहे. त्यापूर्वी समितीला राहुल आणि जडेजा यांच्या तंदुरुस्तीचा अहवाल फिजिओंकडून हवा आहे. पण, जडेजाचा संदेश दिलासा देणारा आहे. (Ind vs Eng Test Series)
View this post on Instagram
(हेही वाचा – Devendra Fadnavis : ‘गाडीखाली कुत्रं आलं तरी …’; घोसाळकर गोळीबारप्रकरणावर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया)
तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला किमान १० दिवसांची विश्रांती
‘मी बरा होतोय,’ असं त्याने आपल्या फोटोसह लिहिलं आहे. पहिल्या हैद्राबाद कसोटीत रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) पहिल्या डावांत ८६ धावा करत भारतीय संघाला (Indian team) ४०० धावांचा टप्पा ओलांडून देण्यात मोठी भूमिका बजावली होती. पण, नंतर दुसऱ्या डावात ४ धावांवर तो धावचीत झाला. शिवाय ही चोरटी धाव घेताना त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला. आणि तो दुसरी विशाखापट्टणम कसोटी खेळू शकला नव्हता. इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सच्या अप्रतिम फेकीमुळे तो धावचीत झाला. (Ind vs Eng Test Series)
जडेजाला (Ravindra Jadeja) उपचारांसाठी तातडीने बंगळुरूतील बीसीसीआयच्या क्रिकेट अकादमीत पाठवण्यात आलं. दुसरी कसोटी संपल्यानंतर मध्ये १० दिवसांची सुट्टी आहे. त्यामुळे जडेजा (Ravindra Jadeja) आणि राहुललाही दुखापतीतून सावरण्यासाठी चांगला वेळ मिळाला आहे. फिजिओंनी त्यांना तंदुरुस्तीचं प्रमाणपत्र दिलं तर दोघेही तिसऱ्या कसोटीत खेळू शकतील. (Ind vs Eng Test Series)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community