Ind vs Eng : शून्यावर बाद झाल्यावर विराटने जेव्हा सोफ्यावर राग काढला 

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला. जो फटका खेळून तो बाद झाला त्याची रिप्ले टीव्हीवर पाहिल्यावर विराटचा राग अनावर झाला. आणि त्याने नेमकं काय केलं पाहूया

155
Ind vs Eng : शून्यावर बाद झाल्यावर विराटने जेव्हा सोफ्यावर राग काढला 
Ind vs Eng : शून्यावर बाद झाल्यावर विराटने जेव्हा सोफ्यावर राग काढला 

ऋजुता लुकतुके

या विश्वचषकात आतापर्यंत दमदार कामगिरी करणारा विराट कोहली इंग्लंड विरुद्ध (Ind vs Eng) मात्र भोपळाही न फोडता बाद झाला. आधीच्या ८ चेंडूंवर एकही धाव न घेता आलेल्या विराटने तेरावा चेंडू लाँग-ऑनच्या दिशेनं टोलवण्याचा प्रयत्न केला. आणि नेमका तो फटका बरोबर बसला नाही. आणि तो मिड-ऑनला झेल देऊन बाद झाला. डेव्हिड विली आणि इतर गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत तेव्हा भारतीय फलंदाजांवर दडपण वाढवलं होतं.

विराट विश्वचषकात पहिल्यांच शून्यावर बाद झाला. (Ind vs Eng) हा नकोसा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला. त्यातही खराब फटका खेळून बाद झाल्यामुळे विराट स्वत:वर चिडलेलाच होता. ड्रेसिंग रुममध्ये गेल्यावर त्याने मुक्तपणे आपला राग व्यक्त केला.

विराटने रागाच्या भरात ड्रेसिंगरुममधल्या सोफ्याला एक जोरदार पंच दिला. पुढची काही मिनिटं तो तिथेच घुश्शात बसून होता.

(हेही वाचा-Andhra Pradesh Train Accident : अपघातात १३ जणांचा मृत्यू तर ४० प्रवासी जखमी)

डेव्हिड विलीच्या चेंडूवर तो खराब फटका खेळण्यापूर्वी इंग्लिश जलदगती गोलंदाजांनी विराट आणि दुसऱ्या एंडला खेळणाऱ्या रोहीत शर्माला अचूक गोलंदाजी करून जखडून ठेवलं होतं. शक्यतो विराटला गोलंदाजांनी वर्चस्व राखलेलं आवडत नाही. अशावेळी तो आक्रमक होऊन त्यांना प्रत्युत्तर देतो. तेच त्याने रविवारी केलं. आणि नेमका तो फटका बरोबर बसला नाही.

विराट आतापर्यंतच्या विश्वचषकातील ५६ डावांमध्ये पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला आहे. हा नकोसा विक्रम आज त्याच्या नावावर लागला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होण्याची ही त्याची ३४ वी खेप आहे. हा ही एक विक्रमच आहे. सचिन तेंडुलकरच्या बरोबरीने आता विराट सगळ्यात जास्त वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे.

आजच्या सामन्याचा अपवाद वगळला तर विराट या स्पर्धेत चांगलाच फॉर्ममध्ये आहे. आणि आतापर्यंत त्याने ८५ (ऑस्ट्रेलिया), नाबाद ५५ (अफगाणिस्तान), १६ (पाकिस्तान), नाबाद १०३ (बांगलादेश) आणि ९७ (न्यूझीलंड) अशा ३५६ धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून तो अवधं एक शतक दूर आहे. सध्या त्याच्या नावावर ४८ एकदिवसीय शतकं जमा आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.