-
ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर भारतीय संघ आता इंग्लंड विरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेची तयारी करत आहे. आणि या मालिकांसाठी के एल राहुलला विश्रांती देण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियात के एल राहुल आघाडीच्या फळीत चांगली फलंदाजी करत होता. पण, नवीन खेळाडूंना संधी द्यावी यासाठी भारतीय संघात काही प्रयोग अपेक्षित आहेत. राहुल एकदिवसीय क्रिकेटमध्ये मधल्या फळीत खेळतो. तसंच तो यष्टीरक्षणही करू शकतो. आता विश्रांती देत असताना चॅम्पियन्स करंडकात त्याच्या सहभागाची हमी त्याला देण्यात आली आहे. (Ind vs Eng, White Ball Cricket)
(हेही वाचा- Virat Kohli : विराटला एकदिवसीय क्रिकेटमधून सूर सापडले अशी माजी भारतीय प्रशिक्षकाला आशा)
इंग्लंड विरुद्धची टी-२० मालिका २२ जानेवारीपासून कोलकाता इथं सुरू होणार आहे. ‘राहुलाल चॅम्पियन्स करंडकासाठी संघात स्थान मिळेल याची हमी देण्यात आली आहे. पण, इंग्लंड विरुद्ध तो खेळणार नाही,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी टाईम्स समुहाला सांगितलं आहे. राहुल हा भारताचा एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल यष्टीरक्षक फलंदाज आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातही त्याने चांगली कामगिरी करत २ शतकं झळकावली होती. (Ind vs Eng, White Ball Cricket)
बुधवारी ऑस्ट्रेलियातून परतलेल्या राहुलने सध्या विश्रांती घेणं पसंत केलं असून तो विजय हजारे चषकातही कर्नाटकाकडून खेळणार नाहीए. पण, भारतीय संघातून खेळला नाही तर तो रणजीच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र खेळू शकतो. हा टप्पा २३ जानेवारीपासून होणार आहे. भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याला प्राधान्य देण्यास बजावलं आहे. (Ind vs Eng, White Ball Cricket)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community