भारत आणि आयर्लंड (IND vs IRE 3rd T20) यांच्यातील अखेरचा टी 20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे तीन सामन्यांची मालिका भारताने 2-0 ने आपल्या खिशात घातली. आयर्लंडमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. पण दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे नाणेफेकही झाली नाही. त्यामुळे पंचांनी अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
भारतासाठी या मालिकेत (IND vs IRE 3rd T20) अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या. त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जसप्रीत बुमराहची दमदार कामगिरी. शिवाय भारताने या मालिकेत रिंकू सिंहसारख्या नवीन खेळाडूला देखील संधी दिली. रिंकू सिंह याने दुसऱ्या सामन्यात विस्फोटक फलंदाजी करत सामनावीर पुरस्कार पटकावला. तसेच प्रसिद्ध कृष्णाच्या पुनरागमनामुळे भारताची गोलंदाजी देखील आक्रमक झाली. आता भारतीय संघ 2 सप्टेंबरला आशिया कपच्या सामन्यात थेट मैदानात उतरणार आहे.
The third T20I has been abandoned due to rain and wet ground conditions. India win the series 2-0. #TeamIndia #IREvIND pic.twitter.com/sbp2kWYiiO
— BCCI (@BCCI) August 23, 2023
(हेही वाचा – Chandrayaan 3 And AI Technology : या तंत्रज्ञानामुळे शक्य झाले सॉफ्ट लँडिंग)
जसप्रीत बुमराहचा दमदार कमबॅक
भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह (IND vs IRE 3rd T20) याने दमदार कमबॅक केले. बुमराहने दोन सामन्यात आयर्लंडच्या चार फलंदाजांना तंबूत पाठवले. बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे आयर्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. मालिकेतील दमदार कामगिरीमुळे जसप्रीत बुमराह याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. जसप्रीत बुमराहशिवाय प्रसिद्ध कृष्णा याचेही पुनरागमन दमदार झाले. प्रसिद्ध कृष्णा यानेही दोन सामन्यात चार विकेट घेतल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community