ऋजुता लुकतुके
विराट कोहली हा भारतीय संघातील (Ind vs Ned) जिंदादिल खेळाडू आहे. राखीव खेळाडू असताना मैदानावरील खेळाडूंसाठी पाणी न्यायचं असेल तरी तो आपल्या हालचालींनी काहीतरी विनोद निर्मिती करतो. क्षेत्ररक्षण करताना प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो.
रविवारी नेदरलँड विरुद्धच्या (Ind vs Ned) सामन्यात आधी फलंदाजी करताना त्याने ५१ धावा केल्या. आणि मग कर्णधार रोहीत शर्माने त्याला गोलदाजीची संधीही दिली. आणि तिथे षटकातील चौथ्या चेंडूवर विराटने प्रतिस्पर्धा कर्णधार एडवर्ड्सला बाद करण्यात यश मिळवलं.
The best moment Anushka laughs 😂❤️#ViratKohli|#AnushkaSharma|#Virushka pic.twitter.com/410UltD66d
— 𝑽𝒆𝒅𝒂𝒏𝒕`¹⁸ (@itsmevedant_18) November 12, 2023
लेग साईडला थोड्या वाईड पडलेल्या चेंडूवर एडवर्ड्स ग्लान्सचा फटका खेळायला गेला. पण, चेंडू बॅटला लागून थेट यष्टीरक्षक के एल राहुलच्या हाती विसावला. विराटचा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील हा पहिलाच बळी होता. चिन्नास्वामी मैदानावर विराटच्या या यशामुळे एकच जल्लोष सुरू झाला.
या जल्लोषात सहभागी झाली होती विराटची पत्नी अनुष्का शर्माही. तिने पॅव्हेलियनमध्ये जल्लोष केला. तिला आपला आनंद लपवता येत नव्हता. आणि गोलंदाजीत मिळवलेलं यश साजरं करण्यात तिने कसूर केली नाही. ती टाळ्या पिटत होती. आणि हसत होती.
स्टेडिअमवरील टीव्ही स्क्रीनवर तिचा हा आनंद दिसल्यावर प्रेक्षकांमध्ये आणखी जल्लोष सुरू झाला. विराटने आतापर्यंत आपल्या धिम्या तर कधी कधी मध्यमगती माऱ्याने पाच एकदिवसीय बळी टिपले आहेत. २०१४ मध्ये वेलिंग्टन इथं किवी कर्णधार ब्रँडन मॅक्युलमचा त्याने मिळवलेला बळी हा त्याचा एकदिवसीय क्रिकेटमधील शेवटचा होता. तर २०१६च्या वर्ल्ड टी-२० स्पर्धेत त्याने विंडिजच्या तळाच्या फलंदाजाला बाद केलं होतं.
या विश्वचषकात विराटने यापूर्वी फक्त तीन चेंडू टाकले होते. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात हार्दिकचा पायाचा घोटा दुखावला तेव्हा त्याचं षटक विराटनेच पूर्ण केलं होतं.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community