-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघाचा रविवारी बंगळुरूमध्ये नेदरलँड्सच्या संघाशी मुकाबला आहे. पण, खेळाडूंची खरी नजर असेल ती १५ तारखेला होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यावर. त्या दृष्टीनेच विराट कोहलीने शुक्रवारी सराव केला. (Ind vs Ned)
भारतीय संघाला आधीच्या सामन्यानंतर नेदरलँड्स बरोबरच्या सामन्यापूर्वी एक आठवड्याचा वेळ मिळाला आहे. या विश्रतांतीमुळे मनाने ताजातवाना झालेला भारतीय संघ आता नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. पण, लढत जरी डच संघाशी असली तरी खेळाडूंच्या मनात १५ तारखेच्या उपांत्य सामन्याचा विचार सुरू असणारए. (Ind vs Ned)
बंगळुरूचं चिन्नास्वामी मैदान आणि पहिल्या उपांत्य लढतीचं वानखेडे मैदान यात दोन मोठी साम्यं आहेत. दोन्ही मैदानं तुलनेनं छोटी त्यामुळे इथं षटकारांची शक्यता जास्त आहे. शिवाय दोन्ही खेळपट्ट्या सुरुवातीला फिरकीला साथ देणाऱ्या आहेत. फलंदाजांचा जम बसेपर्यंत इथं मोठे फटके खेळणं थोडं अवघड आहे. (Ind vs Ned)
भारतीय संघही सराव करताना ही साम्यस्थळं लक्षात घेऊनच सराव करताना दिसतोय. शुक्रवारी नेट्समध्ये विराट कोहलीने फलंदाजीचा २-३ तास सराव केला. यात त्याचा भर आखूड टप्प्याचे चेंडू खेळणं, षटकार ठोकणं आणि डावखुरी फिरकी खेळणं यावर होता. (Ind vs Ned)
King Kohli at his Kingdom…..!!!! pic.twitter.com/WGcBAvTAyM
— Johns. (@CricCrazyJohns) November 10, 2023
विराट कोहली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो. म्हणजे हे त्याचं घरचं मैदानच आहे. पण, यावेळी कोहली नेदरलँड्सच्या सामन्याची नाही तर उपांत्य फेरीची तयारी करत होता. किवी गोलंदाज लॉकी फर्ग्युसनचे आखूड टप्प्याचे चेंडू आणि डावखुरा फिरकी गोलंदाज मिटेल सँटर यांना सामोरं जाण्यासाठी विराट सराव करताना दिसला. (Ind vs Ned)
(हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधी अशोक गहलोत यांच्यावर नाराज?)
शार्दूल ठाकूर विराटला वेगवान बाऊन्सर टाकत होता. तर रवी जाडेजाच्या फिरकीवरही त्याने सराव केला. रोहित शर्मा नेट्समध्ये युवा शुभमन गिलबरोबर वेळ घालवताना दिसला. (Ind vs Ned)
Captain Rohit Sharma is getting ready….!!!! [Sportstar]
– Time to make 9 out of 9. pic.twitter.com/toBaU7N4zY
— Johns. (@CricCrazyJohns) November 10, 2023
भारतीय संघासाठी हा वैकल्पिक सराव होता. पण, ईशान किशन वगळता सगळ्यांनीच यात भाग घेतला आणि जोरदार सरावही केला. जसप्रीत बुमरा, मोहम्मद शामी यांनी फलंदाजीचाही सराव केला. (Ind vs Ned)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community