Ind vs NZ, 1st Test : रिषभ पंतच्या दुखापतीवर रोहित शर्माचा महत्त्वाचा अपडेट 

Ind vs NZ, 1st Test : रिषभला ज्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती त्याच पायावर चेंडू लागला

60
Ind vs NZ, 1st Test : रिषभ पंतच्या दुखापतीवर रोहित शर्माचा महत्त्वाचा अपडेट 
Ind vs NZ, 1st Test : रिषभ पंतच्या दुखापतीवर रोहित शर्माचा महत्त्वाचा अपडेट 
  • ऋजुता लुकतुके 

भारत विरुद्ध न्यूझीलंड बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ दीड सत्रातच ४६ धावांत गुंडाळला गेला. हे कमी होतं म्हणून तिसऱ्या सत्रात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) लंगडत मैदानाबाहेर गेला. यष्टीरक्षण करताना चेंडू त्याच्या गुडघ्याला लागला. मैदानावर त्याने काही मिनिटं उपचार घेऊन बघितले. पण, त्याला नीट चालताही येत नव्हतं. त्यामुळे पंत मैदानाबाहेर गेला. त्याच्या जागी ध्रुव जुरेलने उरलेली ४५ मिनिटं यष्टीरक्षण केलं. (Ind vs NZ, 1st Test)

(हेही वाचा- देशाला प्रथमस्थानी ठेवण्यासाठी मतदान करा; Kamala Harris यांचे आवाहन)

खेळ पुढे सुरू झाल्यावरही रिषभ पंत (Rishabh Pant) सीमारेषेपलीकडे बसला होता. चालताना अडखळत होता. पण, सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पंतच्या दुखापतीवर अपडेट दिला. त्याच्या शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यावर चेंडू बसल्यामुळे थोडा पाय सुजला आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यात त्याने यष्टीरक्षण केलं नाही. (Ind vs NZ, 1st Test)

 ‘दुर्दैवाने चेंडू थेट त्याच्या दुखऱ्या गुडघ्यावर बसला. इथले स्नायू अजून पुरेसे मजबूत नाहीत. त्यामुळे गुडघा सुजला आहे. पण, दुखापत फारशी गंभीर नाही. खबरदारीचा उपाय म्हणून फक्त आम्ही त्याला बाहेर जायला सांगितलं,’ असं रोहित म्हणाला. किवी डाव सुरू असताना ३८ व्या षटकात रवींद्र जडेजाचा चेंडू रिषभच्या गुडघ्यावर बसला. (Ind vs NZ, 1st Test)

(हेही वाचा- Vidhansabha Election 2024: निवडणूक आचारसंहितेतही मिळणार आनंदाचा शिधा, राजकीय फोटो नसलेल्या किटचे होणार वाटप)

डिसेंबर २०२२ मध्ये रिषभ पंतला रस्ते अपघातात दुखापत झाली होती. त्यानंतर यावर्षी आयपीएलमध्ये त्याने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. त्यानंतर टी-२० विश्वचषकात तो भारतीय संघातून खेळला. आता कसोटी संघातही तो यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळतोय. (Ind vs NZ, 1st Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.