-
ऋजुता लुकतुके
बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघ पहिल्या डावात ४६ धावांत सर्वबाद झाला. या कामगिरीमुळे अर्थातच कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हताश झाला आहे. संघाकडून इतकी नीच्चांकी कामगिरी डोळ्याने पाहणं हे खूप दु:खदायक होतं, असं रोहितने पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच स्पष्ट केलं. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिली फलंदाजी घेण्याचा निर्णय आपलाच होता, आणि वर्षातून असा एखादा चुकीचा निर्णय चालतो, असं मग रोहीत गमतीने म्हणाला. ‘कर्णघार म्हणून संघ ४६ धावांत बाद झालेला बघताना खूपच दु:ख झालं. खासकरून तो निर्णय माझाच असल्यामुळे जास्त वाईट वाटलं,’ असं रोहीत म्हणाला. यानंतर लगेच तो म्हणाला, ‘एका वर्षात असा एकाद-दुसरा चुकीचा निर्णय चालतो.’ (Ind vs NZ, 1st Test)
That will be Stumps on Day 2 of the 1st #INDvNZ Test!
New Zealand move to 180/3 in the first innings, lead by 134 runs.
See you tomorrow for Day 3 action.
Scorecard – https://t.co/FS97LlvDjY#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ZvoDdxdb0O
— BCCI (@BCCI) October 17, 2024
भारतीय फलंदाजांचीही रोहितने (Rohit Sharma) बाजू घेतली. ‘आता आम्ही ४६ धावांत बाद झालो म्हटल्यावर खेळाडूंनी चुकीचे फटके खेळले असं लोक म्हणणारच. पण, खरंतर हा दिवसच वाईट होता. आमची योजना तयार होती. पण, तिची अंमलबजावणी हवी तशी झाली नाही. विराटला आम्ही तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं, सर्फराझला चौथ्या. पण, ते दोघंही झटपट बाद झाले,’ रोहितने आपला मुद्दा मांडला. (Ind vs NZ, 1st Test)
(हेही वाचा- Vidhansabha Election 2024: निवडणूक आचारसंहितेतही मिळणार आनंदाचा शिधा, राजकीय फोटो नसलेल्या किटचे होणार वाटप)
भारतीय संघाची भारतातील ही नीच्चांकी धावसंख्या होती. यापूर्वी १९८५ मध्ये भारतीय संघाने नवी दिल्लीत वेस्ट इंडिज विरुद्ध ७५ धावा केल्या होत्या. तर २०२० मध्ये ॲडलेडमध्ये भारतीय संघ ३६ धावांवर सर्वबाद झाला होता. ती भारताची देशात आणि परदेशात मिळून नीच्चांकी धावसंख्या आहे. (Ind vs NZ, 1st Test)
भारतीय संघाच्या नीच्चांकी धावसंख्या |
|||
धावसंख्या |
विरुद्ध |
ठिकाण |
साल |
३६ |
ऑस्ट्रेलिया |
ॲडलेड |
२०२० |
४२ |
इंग्लंड |
लॉर्ड्स |
१९७४ |
४६ |
न्यूझीलंड |
बंगळुरू |
२०२४ |
५८ |
ऑस्ट्रेलिया |
ब्रिस्बेन |
१९४७ |
५८ |
इंग्लंड |
मॅन्चेस्टर |
१९५२ |
६६ |
दक्षिण आफ्रिका |
दरबन |
१९९६ |
६७ |
ऑस्ट्रेलिया |
मेलबर्न |
१९४८ |
७५ |
वेस्ट इंडिज |
नवी दिल्ली |
१९८७ |