-
ऋजुता लुकतुके
बंगळुरू कसोटीत भारताचा पहिला डाव ४६ धावांतच आटोपल्यानंतर संघ ३५६ धावांनी पिछाडीवर पडला होता. पण, दुसऱ्या डावात मात्र भारतीय फलंदाज झुंज देत आहेत. तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद २३१ ही धावसंख्याही त्यांनी गाठली होती. दुसऱ्या डावात भारताचे दोन बळी संघाला कायम लक्षात राहतील असे ठरले. ५२ धावांवर खेळत असलेला आणि चांगला जम बसलेला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) त्रिफळाचीत झाला तो क्षण आणि दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर बॅटची अगदी अलगद कड घेऊन यष्टीरक्षकाकडे झेल देऊन विराट बाद झाला तो क्षण. विराट आणि सर्फऱाझचा तेव्हा जम बसला होता. दोघांनी १३४ धावांची भागिदारीही रचली होती. शिवाय दिवस अखेर दोनच गडी बाद झाल्याचं मानसिक समाधान भारतीय संघाला होतं. अशावेळी नेमकी माशी शिंकली. (Ind vs NZ, 1st Test)
(हेही वाचा- Pune Fire News : पुण्यात ग्रंथालयाला भीषण आग! अग्निशामक दल घटनास्थळी दाखल )
या दोन्ही बळींच्या वेळी कर्णधार म्हणून रोहित शर्माचा (Rohit Sharma) चेहरा बघण्यासारखा झाला होता. तो स्वत; बाद झाला तेव्हा भारत १ बाद ९२ वर होता. यशस्वी काही वेळापूर्वीच अवसानघातकी फटका खेळून बाद झाला होता. रोहित ५२ वर खेळत होता. एझाझ पटेलचा एक चेंडू त्याने शांतपणे तटवला. पण, तो नेमका बॅटच्या मागे गेला. जमिनीवर एक टप्पा पडून तो थेट यष्ट्यांवर आदळला. काही कळायच्या आत बेल्स उडाल्या. रोहीतला हताशपणे बघत राहण्यावाचून पर्याय नव्हता. (Ind vs NZ, 1st Test)
Unlucky dismissal for Rohit Sharma.
📸: Jio Cinema pic.twitter.com/bugoGtIX4g
— CricTracker (@Cricketracker) October 18, 2024
भारतीय संघाची जास्त पडझड नशीबाने झाली नाही. विराट आणि सर्फराझने डाव सांभाळला. दोघांनी १३४ धावांची भागिदारी केली. दिवस संपायला शेवटची काही षटकं असताना दोघं जपून खेळत फक्त वेळ काढण्याचं धोरण ठेवून होते. विराटचा मनसुबाही तोच होता. पण, अचानक दिवसाचा शेवटचा चेंडू त्याला वाटलं तितका वळला नाही. सरळ रेषेतील हा चेंडू त्याची बॅट टाळू शकली नाही. (Ind vs NZ, 1st Test)
Kismat toh aese roothi padi haina….
WELL PLAYED, VIRAT KOHLI…!!! 🐐
70 (102) – dismissed on the very last ball of the Day pic.twitter.com/uuyuIqpqMM
— Vishal (@VISHALY6G) October 18, 2024
विराटच्या बॅटची अगदी वरवरची हलकी कड घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. भारतीय संघाला हा मोठा धक्का होता. एकतर जमलेली भागिदारी मोडली. चांगला खेळणारा विराट बाद झाला. ड्रेसिंग रुममध्ये बसलेला रोहित शर्मा त्यामुळे हताश झालेला दिसला. काही क्षण त्याचा चेहरा चांगलाच पडला होता. आता सर्फराझ खानवर राहुल, रिषभ आणि जडेजाच्या साथीने भारतीय डाव पुढे नेण्याची जबाबदारी आहे. (Ind vs NZ, 1st Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community