Ind vs NZ, 1st Test : जिगरबाज विराट कोहली आता सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्या पंक्तीत

Ind vs NZ, 1st Test : न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या डावात ७० धावा करत विराटने ९,००० धावा पूर्ण केल्या

121
Ind vs NZ, 1st Test : जिगरबाज विराट कोहली आता सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्या पंक्तीत
Ind vs NZ, 1st Test : जिगरबाज विराट कोहली आता सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्या पंक्तीत
  • ऋजुता लुकतुके 

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) या वर्षातील आपलं पहिली कसोटी अर्धशतक बंगळुरूमध्ये झळकवलं. त्याचबरोबर भारतीय क्रिकेटमध्ये एक मानाचा टप्पाही सर केला आहे. कसोटी कारकीर्दीतील ९,००० धावा पूर्ण करताना विराट सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), राहुल द्रविड (Rahul Dravid), सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. या कामगिरीसाठी विराटने १९७ डाव घेतले. महत्त्वाचं म्हणजे भारतीय संघाला त्याची गरज असताना आणि २ बाद ९२ धावांवर संघ अडखळत असताना त्याने ही बहुमोल खेळी केली. सर्फऱाझसह भारतीय डाव सावरला. भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता विराट चौथ्या स्थानावर आहे. (Ind vs NZ, 1st Test)

(हेही वाचा- Assembly Election 2024 : मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर शेवटची संधी)

सचिनने कसोटीत सर्वाधिक १५,९२१ धावा केल्या आहेत. त्या खालोखाल राहुल द्रविडने १३,२६५ आणि सुनील गावसकर यांनी १०,१२२ धावा केल्या आहेत. कसोटीत १०,००० धावांचा टप्पा पार करणारे सुनील गावसकर हे आधुनिक क्रिकेटमधील पहिले क्रिकेटपटू आहेत. तर सचिन तेंडुलकरने हा मापदंड आता १५,००० च्या वर नेला आहे. १५,००० कसोटी धावा करणारा सचिन एकमेव फलंदाज आहे. (Ind vs NZ, 1st Test)

 पण, विराटने हा टप्पा गाठण्यासाठी सर्वाधिक कसोटी डाव खेळले आहेत. ९,००० धावांचा विचार केला तर सुनील गावसकर यांनी १९८५ मध्ये हा टप्पा गाठला तेव्हा ते १९२ डाव खेळले होते. सचिन तेंडुलकरने २००४ मध्ये हा टप्पा पूर्ण केला. आणि त्यासाठी तो १७९ डाव खेळला. २००६ मध्ये राहुल द्रविडनेही ९,००० कसोटी धावा पूर्ण केल्या. आणि त्याने त्यासाठी सर्वात कमी म्हणजे १७६ डाव घेतले. विराटने खरंतर ८,००० कसोटी धावांचा टप्पा मार्च २०२२ मध्येच ओलांडला होता. पण, त्यानंतर पुढील १,००० धावा करण्यासाठी विराटने अडीच वर्षं घेतली.  (Ind vs NZ, 1st Test)

(हेही वाचा- Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीतील जागावाटप जवळपास पूर्ण; फक्त मोजक्याच जागांचा ‘तिढा’ शिल्लक)

आताही दुर्दैवाने दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर तो ७० धावा करून बाद झाला. त्यामुळे तो शतकाच्या जवळ जाऊ शकला नाही. अलीकडेच विराटने (Virat Kohli) २७,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत. कसोटीत मात्र यावर्षी ४ सामन्यांत त्याने २६ च्या सरासरीने जेमतेम १५७ धावा के्ल्या आहेत.  (Ind vs NZ, 1st Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.