Ind vs NZ, 2nd Test : न्यूझीलंडच्या गहुंजे स्टेडिअमवर १०० मिली पाण्यासाठी मोजावे लागत होते ८० रुपये 

Ind vs NZ, 2nd Test : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर नियोजनाचा संपूर्ण अभाव दिसून आला

111
Ind vs NZ, 2nd Test : न्यूझीलंडच्या गहुंजे स्टेडिअमवर १०० मिली पाण्यासाठी मोजावे लागत होते ८० रुपये 
Ind vs NZ, 2nd Test : न्यूझीलंडच्या गहुंजे स्टेडिअमवर १०० मिली पाण्यासाठी मोजावे लागत होते ८० रुपये 
  • ऋजुता लुकतुके 

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना पाहण्यासाठी पुण्याजवळच्या गहुंजे मैदानावर पहिल्या दिवशी २०,००० च्या वर लोकांनी गर्दी केली होती. पण, क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या या चाहत्यांना मूलभूत सुविधाही इथं मिळाल्या नाहीत. पिण्याचं पाणीच वेळेवर मैदानात न पोहोचल्याने प्रेक्षकांना १० मिली पाण्यासाठी ८० रुपये मोजावे लागत होते. या व्यवस्थेला कंटाळून काही प्रेक्षकांनी एमसीएची हूर्यो उडवणाऱ्या काही घोषणाही दिल्या. अखेर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने दिवसअखेर गैरव्यवस्थेसाठी प्रेक्षकांची माफीही मागितली. (Ind vs NZ, 2nd Test)

(हेही वाचा- कोरोना काळ आठवा, मविआला दंडित करण्यासाठी मतदान करा; Ashish shelar यांचे आवाहन)

गहुंजे मैदानातील प्रेक्षकांची व्यवस्था ही खुली म्हणजे वर छत नसलेली आहे. खूप कमी स्टँडमध्ये वर छप्पर आहे. त्यातच तापमान ३४ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं. पहिलं सत्र संपल्यानंतर अनेक प्रेक्षक पाण्यासाठी ठेवलेल्या टपऱ्यांवर पोहोचले. या अधिकृत टपऱ्या बंद होत्या.  (Ind vs NZ, 2nd Test)

प्रेक्षक चिडल्यावर सुरक्षा रक्षकांनी पाण्याच्या बाटल्या वितरित करायला सुरुवात केली. झालं असं होतं की सुरुवातीला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात बांधलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणीच नव्हतं. ते उशिरा आलं. त्यामुळे अखेर प्रेक्षकांना बाटलीबंद पाणी पुरवण्यावाचून आयोजकांना पर्यायच राहिला नाही. पण, आंतरराष्ट्रीय सामना तो ही पाच दिवसांचा असताना पाण्याची मूलभूत सोय महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने का केली नाही हा प्रश्नच आहे. ‘आम्हाला प्रेक्षकांना थंड पाणी पुरवायचं होतं. त्यासाठी आम्ही व्यवस्थाही केली होती. पण, १५ ते २० मिनिटांत पाणी संपलं. कारण, खानपानाच्या सुटीत प्रेक्षकांची संख्या अचानक वाढली. मग आम्ही बाटलीबंद पाणी पुरवून त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला,’ असं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव कमलेश पिसाळ यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. (Ind vs NZ, 2nd Test)

(हेही वाचा- Justice Sanjiv Khanna: भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना ‘या’ तारखेला शपथ घेणार)

पण, सोशल मीडियावर दिवसभर आणि दिवसाचा खेळ संपल्यानंतरही याची चर्चा होतच राहिली.

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.