Ind vs NZ, 2nd Test : भारतीय संघातील एका स्थानासाठी के एल राहुल वि सर्फराझ खान असा सामना 

Ind vs NZ, 2nd Test : पुणे कसोटीत मधल्या फळीत कोण खेळणार यावरून चर्चा सुरू आहे 

52
Ind vs NZ, 2nd Test : भारतीय संघातील एका स्थानासाठी के एल राहुल वि सर्फराझ खान असा सामना 
Ind vs NZ, 2nd Test : भारतीय संघातील एका स्थानासाठी के एल राहुल वि सर्फराझ खान असा सामना 
  • ऋजुता लुकतुके 

न्यूझीलंड विरुद्धची दुसरी कसोटी २३ तारखेपासून पुण्यात सुरू होत आहे. मालिकेत भारतीय संघ ०-१ ने पिछाडीवर आहे. आणि अशावेळी संघ निवडीचा एक पेचही संघ प्रशासनासमोर उभा आहे. या कसोटीसाठी शुभमन गिल आणि रिषभ पंत हे तंदुरुस्त झाले आहेत. तर निवड समितीने वॉशिंग्टन सुंदरलाही संघात स्थान दिलं आहे. अशावेळी पुणे कसोटीत अंतिम अकरांमध्ये कुणाला स्थान मिळणार हा खरा प्रश्न आहे. (Ind vs NZ, 2nd Test)

(हेही वाचा- हिंदू म्हणून काम करत रहावे; ज्येष्ठ अभिनेते Rahul Solapurkar यांचे आवाहन)

शुभमन गिल दुखापतग्रस्त असल्यामुळे पहिल्या कसोटीत सर्फराझला संघात स्थान मिळालं. त्याने दुसऱ्या डावात १५० धावा करत आपला दावा आणखी भक्कम केला आहे. तर के एल राहुल पहिल्या डावात शून्यावर आणि दुसऱ्या डावात १२ धावांवर बाद झाला होता. पण, संघ प्रशासनाचा आणि खासकरून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचाही राहुलला पाठिंबा आहे. सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डयुसकाटे यांनी गंभीरची भूमिका कसोटी पूर्वीच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली होती. (Ind vs NZ, 2nd Test)

‘इतरांच्या जागा नक्की आहेत. प्रश्न राहुल आणि सर्फराझ यांच्यात आहे. आम्हाला ६ मोकळ्या जागांमध्ये सात ठोकळे बसवायचे आहेत. ते कसं करायचं पुणे कसोटीपूर्वी ठरवायचं आहे. बंगळुरूत मी राहुलशी बोललो आहे. त्याची मानसिक तयारी चांगली आहे. तो चांगला क्रिकेटपटू आहे. चेंडू खेळण्याविषयी तो सकारात्मक आहे. तो चेंडू खेळून चकलाय असं पहिल्या कसोटीत झालेलं नाही. गंभीरही त्याला संधी मिळावी याच मताचा आहे. आता आम्ही सगळे मिळून पुणे कसोटीपूर्वी काय तो निर्णय घेऊ,’ असं ड्यूसकाटे म्हणाला. (Ind vs NZ, 2nd Test)

(हेही वाचा- Bombay High Court : मुस्लिम पुरुषांच्या एका पेक्षा अधिक ‘विवाहाला’ आता कायद्याची मान्यता! )

पण, त्याचवेळी सर्फराझ खानच्या पाठीशी इराणी चषकातील २२२ धावा आहेत. पहिल्या कसोटीतील १५० धावांचं पाठबळ आहे. त्यामुळे संघासाठी योग्य तोच निर्णय निवड समिती आणि संघ प्रशासनाला घ्यायचाय हे उघड आहे. गंभीर, रोहीत आणि संघ प्रशासनासमोर आता दोन पर्याय आहेत. राहुल आणि सर्फराझ यांच्यातील एकाची निवड करण्याचा. किंवा शुभमन गिलला आणखी विश्रांती देऊन त्याच्या जागी या दोघांना एकत्र संघात घेण्याचा. पण, शुभमन गिलकडे भविष्यातील नेतृत्व म्हणून पाहिलं जात असताना ती शक्यता कमीच आहे. (Ind vs NZ, 2nd Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.