-
ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार अष्टपैलू फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या डावात ३ बळी मिळवले. त्याचबरोबर त्याने ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्धी नॅथन लिऑनला मागे टाकलं आहे. अश्विनचे आता आंतरराष्ट्रीय कसोटींत ५३१ बळी झाले आहेत. तो जगातील सातवा यशस्वी गोलंदाज ठरला आहे. बळींच्या बाबतीत सध्या खेळत असलेला सर्वात यशस्वी ऑफस्पिनर अश्विनच आहे. पुण्यात ३ बळी खेळताना त्याने ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लिऑनला मागे टाकलं. लिऑनचे ५३० बळी आहेत. भारताला या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. तिथे अश्विन विरुद्ध लिऑन असा मुकाबला असणार आहे. (Ind vs NZ, 2nd Test)
(हेही वाचा- Ajit Pawar गटाची दुसरी यादी जाहीर; सना मलिक यांना अणुशक्तीनगर पूर्वची उमेदवारी)
अलीकडच्या काळात अश्विन हाच भारताचा मुख्य फिरकीपटू आहे. १०४ कसोटींमध्ये त्याने २३.४७ च्या सरासरीने ५३१ बळी मिळवले आहेत. त्याचा स्ट्राईकरेटही ५० धावांचा आहे. उजव्या हाताने खेळणाऱ्या आणि डावखुऱ्या फलंदाजांनाही अश्विन प्रभावी गोलंदाजी करू शकतो. (Ind vs NZ, 2nd Test)
जगभरात सर्वाधिक बळी मिळवलेले गोलंदाज
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) – ८००
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – ७०८
जेम्स अँडरसन (इंग्लंड) – ७०४
अनिल कुंबळे (भारत) – ६१९
स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) – ६०४
ग्लेन मॅग्रा (ऑस्ट्रेलिया) – ५६३
रवीचंद्रन अश्विन (भारत) – ५३१
नॅथन लिऑन (ऑस्ट्रेलिया) – ५३०
(हेही वाचा- आमचे फटाके २३ नोव्हेंबरला फुटणार; Amit Thackeray नी व्यक्त केला विश्वास)
पुणे कसोटीत रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) न्यूझीलंडचे पहिले तीन फलंदाज बाद करून भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. जम बसलेल्या आणि धोकादायक वाटणाऱ्या डेवॉन कॉनवेलाही त्याने ७६ धावांवर बाद केलं. तर विल यंग आणि टॉम लॅथम हे त्याचे इतर दोन बळी ठरले. वॉशिंग्टन सुंदरच्या आणि अश्विनने मिळून न्यूझीलंडचा अख्खा डाव संपवला. प्रतिस्पर्धी संघाचा एखादा डाव दोन फिरकीपटू आणि त्यातही उजव्या हाताने गोलंदाजी करणारे ऑफस्पिनरनी संपवण्याची ही पहिलीच वेळ आहे. (Ind vs NZ, 2nd Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community