-
ऋजुता लुकतुके
सध्या न्यूझीलंड विरुद्ध सुरू असलेल्या मालिकेसाठी भारतीय संघात वॉशिंग्टन सुंदरचाही (Washington Sundar) समावेश करण्यात आला आहे. ‘पुणे कसोटीपूर्वी वॉशिंग्टन भारतीय संगात शामील होईल,’ असं बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. सुंदर सध्या तामिळनाडूकडून रणजी करंडक खेळत आहे. रविवारीच त्याने सेवादलाच्या संघाविरुद्ध १५२ धावा करतानाच २ बळीही मिळवले आहेत. २०२१ मध्ये भारतीय संघाकडून वॉशिंग्टन सुंदर पहिल्यांदा कसोटीत खेळला होता तो बोर्डर – गावसकर चषकात. त्यानंतर ४ कसोटींत त्याने भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. (Ind vs NZ, 2nd Test)
(हेही वाचा- BJP Candidate List : भाजपाने शिवसेनेच्या ५ जागांवर दिले उमेदवार)
यावर्षाच्या सुरुवातीला इंग्लंड विरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेतही सुंदर खेळला होता. या मालिकेत अहमदाबाद कसोटीत तो संघात होता. त्याने एक अर्धशतकही झळकावलं होतं. एकूण ४ कसोटींत वॉशिंग्टन सुंदरने २६४ धावा करताना ६ बळीही मिळवले आहेत. सध्या भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव असे तीन फिरकीपटू खेळत आहेत. शिवाय अक्षर पटेलही संघात आहे. असं असताना तातडीने वॉशिंग्टन सुंदरची संघात निवड झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या तिघांपैकी एकाची जागा तो घेऊ शकेल असा अंदाजही आहे. (Ind vs NZ, 2nd Test)
🚨 News 🚨
Squad Update: Washington Sundar added to squad for the second and third Test#INDvNZ | @IDFCFIRSTBank
Details 🔽
— BCCI (@BCCI) October 20, 2024
न्यूझीलंड विरुद्धची दुसरी कसोटी २४ ऑक्टोबरपासून पुणे इथं सुरू होत आहे. तर तिसरी कसोटी १ नोव्हेंबरपासून मुंबईत होणार आहे. मालिकेत न्यूझीलंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. (Ind vs NZ, 2nd Test)
(हेही वाचा- ’५० खोके एकदम ओके’ ही घोषणा गुन्हा नाही; Mumbai High Court ने फटकारले)
उर्वरित २ कसोटींसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमरा (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराझ खान, के एल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज व आकाश दीप सिंग
हेही पहा-
Join Our WhatsApp Community