- ऋजुता लुकतुके
पुणे कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच न्यूझीलंडचा दुसरा डाव सुरू झाला आणि त्यांनी दिवसभरात ५ बाद १९८ धावाही जमवल्या. संघाकडे असलेली आघाडी ३०२ धावांवर नेली आणि दिवसअखेर कसोटीवर वर्चस्व मिळवलं. किवी फलंदाज भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना त्रास देत होतेच. पण, त्याचवेळी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली त्यांच्यावर आणखी काही कारणांमुळे चिडला होता. एका क्षणी तर त्याने मैदानावरील पंचांकडे दाद मागितली. (Ind vs NZ, 2nd Test)
किवी डावाच्या ३७ व्या षटकांत रवींद्र जाडेजाने एक संधी निर्माण केली होती. किवी कर्णधार तेव्हा ६८ धावांवर खेळत होता. त्याच्या बॅटची कड घेऊन चेंडू स्लिपमध्ये गेला. पण, तिथे उभ्या असलेल्या रोहित शर्मासाठी तो खूपच कठीण झेल होता. चेंडू त्याच्या पुढ्यात होता आणि खूपच खाली होता. हा चेंडू थेट सीमारेषेपार गेला आणि त्यानंतर विराट कोहली मैदानात असलेल्या लिथम आणि ब्लंडेल यांच्याशी तावातावाने चर्चा करताना दिसला. तो या दोघांना खेळपट्टीवर धावू नका असं सांगत असावा. (Ind vs NZ, 2nd Test)
(हेही वाचा – Emerging Asia Cup : अफगाणिस्तानकडून भारताचा धक्कादायक पराभव; अफगाणिस्तान उपांत्य फेरीत )
Aggressive Kohli on the field 🥵 pic.twitter.com/fAqNvX6o48
— Juhi Jain (@juhijain199) October 25, 2024
विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यात विराट चांगलाच चिडलेला दिसत आहे. तो इतर भारतीय खेळाडूंशी चर्चा करतोय. मग त्याने पंचांशीही यावर चर्चा केली. एकेरी-दुहेरी धावा घेताना फलंदाजांनी खेळपट्टीच्या बाजूने धावावं असा संकेत आहे, नाहीतर खेळपट्टी खराब होते. (Ind vs NZ, 2nd Test)
न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावात २५५ धावा केल्या. त्यामुळे भारताला ही कसोटी जिंकण्यासाठी शेवटच्या ३ दिवसांत ३५९ धावा करायच्या आहेत. (Ind vs NZ, 2nd Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community