- ऋजुता लुकतुके
मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवशी अडीच सत्रांवर भारताने संपूर्ण वर्चस्व गाजवलं. न्यूझीलंडला पहिल्या डावात २३५ धावांत गुंडाळलं. त्यानंतर १ बाद ७८ अशा सुस्थितीत असताना शेवटच्या अर्ध्या तासात काही चुकीच्या निर्णयांमुळे भारतीय संघाची दिवसअखेर ४ बाद ८४ अशी दुर्दशा झाली आहे. भारताला शेवटचा एक तास खेळून काढायचा होता. यात रोहित शर्मा १५ धावांवर बाद झाला असला तरी यशस्वी आणि शुभमन यांनी पुढील ५७ चेंडूंमध्ये भारताला ५० धावांची भागिदारी करून दिली होती. आता सामन्याची निर्धारित साडेचारची वेळ संपून सामना अतिरिक्त वेळेत गेला होता. (Ind vs NZ, 3rd Test)
फक्त अर्धा तास खेळून काढायचा असताना आधी जम बसलेल्या यशस्वी जयस्वालने लेंग स्टंपचा चेंडू रिव्हर्स स्विपला तडकावण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो त्रिफळाचित झाला. त्याने ३० धावा केल्या असताना शेवटच्या सत्रात असा चुकीचा फटका खेळला. पण, दुष्टचक्र इतक्यात थांबलं नाही. पाठीमागच्या चेंडूवर नाईटवॉचमन म्हणून आलेला मोहम्मद सिराज पायचीत झाला. शिवाय त्याने रिव्ह्यूही घेतला आणि तो फुकट घालवला. हे कमी म्हणून विराट कोहलीने रचिल रवींद्रच्या चेंडूवर मिडऑनला ड्राईव्हचा फटका मारला. आधीच्या चेंडूवर चौकार ठोकून त्याने खातं उघडलं होतं. पुढच्याच चेंडूवर नसलेली धाव चोरण्याच्या नादात विराट चक्क ४ वर धावचित झाला. मॅट हेन्रीने अचूक फेक करून विराटला माघारी पाठवलं. चुकीचे निर्णय आणि फटके यामुळे शेवटच्या ८ चेंडूंमध्ये भारतीय संघाने तीन आणि ते ही महत्त्वाचे गडी गमावले. सुस्थिती असलेला भारत आता पहिल्याच दिवशी बॅकफूटवर गेला आहे. पहिल्या डावात १४९ धावांनी पिछाडीवर आहे. (Ind vs NZ, 3rd Test)
Stumps on the opening day of the Third Test in Mumbai.#TeamIndia move to 86/4 in the 1st innings, trail by 149 runs.
See you tomorrow for Day 2 action
Scorecard – https://t.co/KNIvTEyxU7#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ppQj8ZBGzz
— BCCI (@BCCI) November 1, 2024
(हेही वाचा – BMC : आयुक्त जेव्हा आपल्या सफाई कामगारांच्या घरी सपत्नीक भेट देत दीपावली साजरी करतात तेव्हा…)
भारताची आघाडीची फळी या मालिकेत सातत्याने अपयशी ठरत आहे. पहिल्या दोन सत्रांमध्ये भारतीय गोलंदाजांनी मात्र आपली कामगिरी चोख बजावली. नाणेफेक किवी कर्णधार टॉम लिथमने जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पण, मुंबईच्या उकाड्यात खेळपट्टीकडून फिरकीपटूंना लगेचच साथ मिळायला लागली. त्याचा फायदा उचलत भारताने किवी पहिला डाव २३५ धावांत गुंडाळला. (Ind vs NZ, 3rd Test)
न्यूझीलंडकडून विल यंगने ७१ तर डेरिल मिचेलने ८२ धावा केल्या. ग्लेन फिलीप्सने थोडाफार प्रतिकार करत १७ धावा केल्या. बाकी फलंदाज फिरकीचा सामना करू शकले नाहीत. भारताकडून रवींद्र जाडेजाने ६५ घावांत ५ बळी मिळवले. तर वॉशिंग्टन सुंदरने ८१ धावांत ४ बळी टिपले. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतील संघाला आता पिछाडी भरून काढण्यावर लक्ष केंद्रीत करावं लागेल. (Ind vs NZ, 3rd Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community