- ऋजुता लुकतुके
भारतीय संघाने मागच्या १८ वर्षांत पहिल्यांदाच मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघ ०-२ ने पिछाडीवर पडला आहे. हा पराभव संघाच्या जिव्हारी लागणाराच आहे. त्यातच बीसीसीआयनेही त्याची दखल घेतली आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या एका बातमीनुसार, त्यांनी भारतीय खेळाडूंची दिवाळीची २ दिवसांची सुटी रद्द केली आहे. अगदी रोहित, विराट आणि बुमराह या तिघांनाही या दिवसांत विशेष सराव सत्रांसाठी उपस्थित राहणं अनिवार्य करण्यात आलंय. (Ind vs NZ, 3rd Test)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १ नोव्हेंबर रोजी मालिकेतील शेवटचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. म्हणजेच भारतीय संघातील खेळाडूंना तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीपूर्वी दोन सराव सत्रांमध्ये सहभागी व्हावे लागेल. ज्यामध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा या खेळाडूंचाही समावेश असेल. म्हणजेच या बड्या खेळाडूंनाही सराव सत्रात सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Ind vs NZ, 3rd Test)
(हेही वाचा – J&K Attack: जम्मू-काश्मीरच्या अखनूरमध्ये लष्कराच्या रुग्णवाहिकेवर हल्ला!)
A tough loss for #TeamIndia in Pune.
Scorecard ▶️ https://t.co/YVjSnKCtlI #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/PlU9iJpGih
— BCCI (@BCCI) October 26, 2024
इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, एका सूत्राने सांगितले की, संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या सरावासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. हे अनिवार्य आहे. कसोटी मालिकेत न्यूझीलंड २-० ने पुढे आहे, त्यामुळे भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत तिसरा कसोटी सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. खरे तर आता या मालिकेत क्लीन स्वीप होण्याची भीती संघ व्यवस्थापनालाही सतावत आहे. (Ind vs NZ, 3rd Test)
आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील परिस्थिती लक्षात घेता, भारतीय संघाला दुसरी चूक परवडणारी नाही. त्यामुळे भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापनाच्या इतर सदस्यांना प्रत्येक खेळाडूने सर्व प्रशिक्षण सत्रात सहभागी व्हावे असे वाटते. पुणे कसोटी संपल्यानंतर मालिकेच्या अंतिम सामन्याच्या तयारीसाठी खेळाडूंना दोन दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे, तर विराट कोहली आणि रोहित शर्मा सारखे खेळाडू आपल्या कुटुंबासह मुंबईत पोहोचले आहेत, आता २९ तारखेला खेळाडू आणि प्रशिक्षक वर्ग मुंबईत वानखेडे स्टेडिअमवर एकत्र येतील. (Ind vs NZ, 3rd Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community