Ind vs NZ, 3rd Test : न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात हर्षित राणा

२२ वर्षीय हर्षित राणाची निवड अंतिम ११ मध्येही होऊ शकते.

72
Ind vs NZ, 3rd Test : न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात हर्षित राणा
Ind vs NZ, 3rd Test : न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात हर्षित राणा
  • ऋजुता लुकतुके

नवी दिल्लीचा युवा तेज गोलंदाज हर्षित राणाचा (Harshit Rana) समावेश भारताच्या कसोटी संघात झाला आहे. १ नोव्हेंबरपासून मुंबईत सुरू होणाऱ्या कसोटी साठी हर्षितची निवड झाली आहे. त्यामुळे दिल्लीसाठी आगामी रणजी सामना तो खेळू शकणार नाहीए. नुकत्याच झालेल्या आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात हर्षितने पहिल्या डावात ५ बळी घेतले होते. त्यानंतर दिल्ली संघासाठी त्याने अर्धशतकही ठोकलं. आणि दुसऱ्या डावात पुन्हा एकदा आसामचे २ बळी घेतले. शिवाय बोर्डर – गावसकर चषक स्पर्धेसाठीही तो भारतीय संघात आहेच.

विशेष म्हणजे राणा पहिल्या दोन कसोटींसाठीही भारतीय संघाबरोबर राखीव खेळाडू म्हणून होता. पण, तिसऱ्या कसोटीपूर्वी आसाम विरुद्धचा सामना खेळण्यासाठी त्याला संघातून मोकळं करण्यात आलं होतं. पण, आता तो संघात परतलया तो थेट मुख्य संघातच. मागचं वर्षभर तो भारतीय संघाबरोबर राखीव फळीत आहे. आसाम विरुद्धच्या सामन्यासाठीही निवड समितीचे सदस्य अजय रात्रा यांच्यासमोर त्याने दमदार केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्यावर निवड समितीने विश्वास टाकला आहे. (Ind vs NZ, 3rd Test)

(हेही वाचा – महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल; Raj Thackeray यांचा विश्वास)

भारतीय फलंदाजी सध्या बहरत नाहीए. आणि त्यातच मागची कित्येक वर्षं भारतीय संघ कपिल देव (Kapil Dev) सारख्या तेज गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूच्या शोधात आहे. मधल्या काळात हार्दिक पांड्याने काही काळ ती जागा भरून काढली. पण, कसोटी संघात पांड्या नियमितपणे बसू शकत नाही. त्यामुळे निवड समितीचा तो शोध अर्धवटच राहिला आहे. (Ind vs NZ, 3rd Test)

अशावेळी हर्षित राणाला (Harshit Rana) ती जागा भरून काढण्याची संधी आहे. शिवाय सध्या भारतीय संघ बुमराहचा अपवाद वगळला तर सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या गोलंदाजाच्या शोधात आहे. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि पुणे कसोटीत आकाशदीपनेही निराशा केली आहे. अशावेळी हर्षित राणाचा समावेश अंतिम अकरामध्ये होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. (Ind vs NZ, 3rd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.