- ऋजुता लुकतुके
न्यूझीलंडचा ज्येष्ठ क्रिकेटपटू केन विल्यमसन तिसऱ्या कसोटीसाठीही भारतात येणार नाहीए. जांघेच्या दुखापतीने त्याला सतायलंय आणि त्यामुळे तो विश्रांती घेतोय. किवी संघ २८ नोव्हेंबरला मायदेशात इंग्लंडबरोबर कसोटी मालिका खेळणार आहे. आणि तोपर्यंत तो तंदुरुस्त होईल अशी शक्यता आहे. न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेडने केन विल्यमसनविषयीचा हा अपडेट दिला आहे. (Ind vs NZ, 3rd Test)
‘केन विल्यमसन आता बरा आहे. पण, इतक्या विमान प्रवास करून भारता येईल आणि इथे कसोटी खेळेल इतका तो बरा नाही,’ असं स्टेड यांनी तिसऱ्या कसोटीपूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. विल्यमसनने १०० टक्के तंदुरुस्त व्हावं ही किवी संघाची प्राथमिकता असल्याचं स्टेड यांनी सांगितलं. (Ind vs NZ, 3rd Test)
Squad News | Kane Williamson will not travel to India for the third Test in Mumbai to ensure he his fit for the upcoming three-Test series against England 🏏 #CricketNationhttps://t.co/HpqP4w6Ufp
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 29, 2024
(हेही वाचा – दर महिन्याला ३ हजार हिंदूंचे Conversion; कैलवरी चर्चचे षडयंत्र उघड)
न्यूझीलंड संघ सध्या विल्यमसनच्या अनुपस्थितीत भारतात चांगली कामगिरी करत आहे. विल्यमसनची उणीव संघाला जाणवलेली नाही. पहिली कसोटी किवी संघाने ८ गडी राखून जिंकली. तर दुसऱ्या पुणे कसोटीत त्यांनी भारतावर ११३ धावांनी विजय मिळवला. महत्त्वाचं म्हणजे भारतीय खेळाडूंना धार्जिण्या खेळपट्ट्यांवर भारतीय गोलंदाज आणि फलंदाजही चमकू शकले नाहीत. पण, किवी खेळाडूंनी ती किमया साधली. पुण्यात पहिल्या दिवसापासून खेळपट्टीवर चेंडू वळत होता. तेव्हाही मिचेल सँटनरने १४ बळी घेऊन भारतीय फलंदाजांना जेरीला आणलं. (Ind vs NZ, 3rd Test)
भारत आणि न्यूढीलंड दरम्यानची मालिकेतील शेवटची आणि तिसरी कसोटी १ नोव्हेंबरला मुंबईत सुरू होणार आहे. या मालिका विजयामुळे न्यूझीलंडसाठी कसोटी अजिंक्यपदाचे दरवाजेही किलकिले झाले आहेत. भारताविरुद्ध मालिकेनंतर मायदेशातील इंग्लंड विरुद्धची मालिका ते जिंकले तर त्यांना चांगली संधी आहे. (Ind vs NZ, 3rd Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community