Ind vs Nz : मैदानात धुकं पसरल्यावर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

118
Ind vs Nz : मैदानात धुकं पसरल्यावर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

ऋजुता लुकतुके

हिमाचल प्रदेशमध्ये धरमशाला (Ind vs Nz) इथं असलेल्या क्रिकेट मैदानावरील या स्पर्धेतील हा चौथा सामना होता. आधीच्या तीनही सामन्यांमध्ये पावसाचा व्यत्यय आला. आणि पाणी सुकण्यासाठी नियमित वेळेपेक्षा जास्त वेळ लागल्याचं पाहायला मिळालं. मैदानावरील आऊटफिल्डबद्दलही जाणकारांनी ताशेरे ओढले.

अशातच कालच्या (रविवार २२ ऑक्टोबर) भारत वि. न्यूझीलंड (Ind vs Nz) सामन्यात तापमान संध्याकाळी १७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरलं. त्यामुळे काही क्षण मैदानावर घनदाट धुकंच पसरलं. भारतीय डावाचं सोळावं षटक तेव्हा सुरू होतं. संघाच्या दोन बाद १०० धावा झाल्या होत्या. तेव्ह विराट कोहली ७ तर श्रेयस अय्यर २१ धावांवर खेळत होते.

अचानक धुक्यामुळे मैदानावर (Ind vs Nz) आजूबाजूचं दिसेनासं झालं होतं. फलंदाजांना चेंडूही नीट दिसत नाही, अशी वेळ आल्यावर पंचांनी काही काळ सामना थांबवला. आणि खेळाडूंना मैदानही सोडावं लागलं. सुदैवाने सामना काही क्षणातच पुन्हा सुरू झाला.

पण, क्रिकेटच्या मैदानात धुक्यामुळे खेळ (Ind vs Nz) थांबल्याची घटना पहिल्यांदाच घडली. त्यामुळे नंतर खेळ सुरू झाला तरी सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडतच राहिला.

(हेही वाचा – Rohit Sharma : हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर ‘या’ विक्रमाची नोंद)

धुक्याला इंग्रजीत फॉग म्हणतात. आणि त्यावरूनच बरेचसे मिम्स (Ind vs Nz) होते. ‘इंडियामें तो फॉग चलता है,’ या एका डिओ ब्रँडच्या जाहिरातीची आठवण अनेकांना झाली.

धुक्याच्या सुमारे १० मिनिटं व्यत्ययानंतर जास्त तीव्रतेच्या फ्लडलाईट्समध्ये सामना (Ind vs Nz) पुन्हा सुरू झाला. आणि भारताने ५ गडी राखून तो जिंकला. विराट कोहलीच्या ९५ धावांनी यात मोठी भूमिका बजावली. विराट आता यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.