ऋजुता लुकतुके
श्रीलंकन संघाचा पाच गडी राखून पराभव करत न्यूझीलंड (Ind vs NZ Semi Final) संघाने आता गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर मजल मारली आहे. त्यामुळे आता नेट रनरेटच्या निकषावर उपान्त्य फेरी गाठण्याची चांगली संधी त्यांना आहे. येत्या १५ नोव्हेंबरला मुंबईत भारत वि. न्यूझीलंड हा उपान्त्य फेरीचा सामना रंगण्याची शक्यता आहे.
यावर ‘उपान्त्य फेरीत पोहोचलोच तर भारतात भारताला हरवणं सोपं नसेल,’ असं (Ind vs NZ Semi Final) न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने बोलून दाखवलं आहे.
New Zealand made a solid push to affirm their place in the top four with a crucial victory over Sri Lanka 👊#NZvSL | #CWC23 | 📝: https://t.co/2hBz4ErQKl pic.twitter.com/ssQiL653dw
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) November 9, 2023
न्यूझीलंड संघाने (Ind vs NZ Semi Final) सध्या ९ सामन्यांतून १० गुण मिळवले आहेत. पण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघाचे ९ गुण आहेत. आणि त्यांचा एकेक सामना बाकी आहे. त्यामुळे या दोघा संघांनाही १० गुण मिळवण्याची संधी आहे. पण, नेट रनरेटमध्ये न्यूझीलंड संघाला मागे टाकणं ही दोन्ही संघांसाठी अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळेच न्यूझीलंडचा उपान्त्य फेरीत प्रवेश जवळ जवळ निश्चित मानला जातोय.
(हेही वाचा – Richards on Virat Kohli : ‘विराट कोहली ही क्रिकेटला लाभलेली देणगी’)
अफगाणिस्तानला न्यूझीलंडपेक्षा (Ind vs NZ Semi Final) पुढे जाण्यासाठी प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिकेला ४०० पेक्षा जास्त धावांनी हरवावं लागेल. तर पाकिस्तानला इंग्लंड बरोबरचा सामना २८७ धावांनी जिंकावा लागेल. किंवा दुसरी फलंदाजी केली तर इंग्लंडला १५० धावांत रोखून, २८७ चेंडू राखून विजय मिळवावा लागेल. या दोन्ही गोष्टी अशक्यप्रायच आहेत.
‘आमच्या इतके गुण आणखीही दोन संघांचे (Ind vs NZ Semi Final) होऊ शकतात. पण, त्याचा विचार आम्ही आता करणार नाही. मधले दोन दिवस आमचा विश्रांती घेण्याचा विचार आहे,’ असं म्हणत विल्यमसनने याविषयी फार बोलण्याचं टाळलं. पण, भारताबरोबर दुसऱ्या सामन्यासाठी संघ तयार आहे का, असं म्हटल्यावर तो लगेच म्हणला, ‘यजमान देशाशी खेळणं तसंही आव्हानात्मक असतं. आणि आम्ही पुन्हा संधी मिळाली तर त्यांच्याशी दोन हात करायला उत्सुक आहोत.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community