Ind vs NZ Semi Final? भारत विरुद्ध न्यूझीलंड संभाव्य उपान्त्य फेरीच्या शक्यतेनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस 

या विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड अशा पहिल्या उपान्त्य लढतीची शक्यता निर्माण झाल्यावर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडू लागला आहे. कारण, सगळ्यांना आठवतोय तो २०१९ च्या विश्वचषकाचा उपान्त्य सामना

130
Ind vs NZ Semi Final? भारत विरुद्ध न्यूझीलंड संभाव्य उपान्त्य फेरीच्या शक्यतेनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस 
Ind vs NZ Semi Final? भारत विरुद्ध न्यूझीलंड संभाव्य उपान्त्य फेरीच्या शक्यतेनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस 

ऋजुता लुकतुके

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी न्यूझीलंडने श्रीलंकेचा ५ गडी राखून पराभव करत उपान्त्य फेरीची आपली दावेदारी बळकट केली आहे, सरस रनरेटच्या आधारे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला मागे टाकून ते उपान्त्य फेरी (Ind vs NZ Semi Final?) गाठतील अशी दाट शक्यता आहे. आणि तसं झालं तर १५ नोव्हेंबरला मुंबईत ही लढत होईल.

या शक्यतेनंतर सोशल मीडियावर मात्र मिम्स सुरू (Ind vs NZ Semi Final?) झाले आहेत. कारण, नेटिझन्सना आठवतेय या दोन संघांदरम्यान झालेला २०१९ च्या विश्वचषकातील उपान्त्य सामना. या स्पर्धेत भारतीय संघ साखळी स्पर्धेत अपराजित होता. आणि न्यूझीलंड विरुद्घही विजयाचा दावेदार होता.

भारतीय गोलंदाजांनी किवी फलंदाजांना २३९ धावांमध्ये रोखलंही होतं. पण, भारताचे पहिले तीन गडी प्रत्येकी एक धाव करून बाद झाले. त्यामुळे भारताची अवस्था ९२ धावांमध्ये ६ बळी अशी झाली होती. त्यानंतर धोणी आणि रवी जाडेजाने डाव सावरला खरा. संघाला त्यांनी २०८ धावांपर्यंत नेऊन विजयाची आशा निर्माण केली. पण, अचानक जाडेजा बाद झाला. आणि पुन्हा एकदा भारतीय डाव घसरला.

(हेही वाचा-Hardik Pandya Injury : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेलाही हार्दिक पांड्या मुकणार?)

शेवटी न्यूझीलंडचा १४ धावांनी निसटता विजय झाला. हा पराभव भारतीय संघाला बोचणारा ठरला होता. त्या सामन्यात मार्टिन गपटिलने धोणीला बाद करत भारताच्या आशा संपवल्या होत्या.

आता पुन्हा एकदा हेच दोन संघ आमने सामने येणार म्हटल्यावर नेटिझन्सना या सामन्याची आठवण होणारच. त्यामुळे सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडत आहे. त्यातलेच काही निवडक इथं बघूया…

२०१९ च्या विश्वचषकातील आणखी काही साम्यस्थळंही इथं आहेत. त्या स्पर्धेतही भारतीय संघ साखळीत अव्वल होता. आणि न्यूझीलंडचा संघ चौथ्या क्रमांकावर होता. फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाबरोबर इंग्लंड हा देश होता. इथं दक्षिण आफ्रिका आहे. तर यंदाही भारतीय संघाने आतापर्यंतचे ८ ही साखळी सामने जिंकले आहेत. यंदाच्या विश्वचषकातील महत्त्वाचा बदल म्हणजे स्पर्धा इंग्लंडमध्ये नाही तर भारतात होतेय.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.