Ind vs Nz Semi Final Tickets : सेमी फायनलची तिकिटे मूळ किंमतीच्या पाच पटीने विकणाऱ्याला अटक

225
Ind vs Nz Semi Final Tickets : सेमी फायनलची तिकिटे मूळ किंमतीच्या पाच पटीने विकणाऱ्याला अटक

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बुधवारी (15 नोव्हेंबर) भारत आणि न्यूझीलंड (Ind vs Nz Semi Final Tickets) यांच्यातील बहुप्रतिक्षित विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आकाश कोठारी असे आरोपीचे नाव असून त्याला जे. जे. पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मालाड येथील त्याच्या राहत्या घरातून त्याला अटक केली.

अनेक ग्रुपमध्ये फिरत (Ind vs Nz Semi Final Tickets) असलेल्या व्हॉट्सअॅप संदेशांनुसार, तिकिटांची 27,000 ते 2.5 लाख रुपयांच्या किंमतीत काळ्या बाजारात विक्री केली जात होती, असे पोलिसांनी सांगितले.

(हेही वाचा – Ind vs Ned : नेदरलँड्स विरुद्धच्या विजयात भारतीय फलंदाजांनी मोडले ‘हे’ विक्रम )

“तो तिकिटे त्याच्या मूळ किंमतीच्या चार ते पाच पटीने विकत होता. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि 511 अंतर्गत फसवणूक आणि इतर गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला आहे. (Ind vs Nz Semi Final Tickets)

तो एकमेव विक्रेता आहे की अधिक लोक या रॅकेटमध्ये (Ind vs Nz Semi Final Tickets) सामील आहेत आणि त्याने तिकिटे कुठून मिळवली हे जाणून घेण्यासाठी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

(हेही वाचा – Robot CEO Mika : ‘या’ कंपनीचा सीईओ आहे एक रोबो)

पोलीस अधिकारी काय म्हणाले?

डी. सी. पी. (सर्कल-1) प्रवीण मुंडेंच्या म्हणण्यानुसार, तिकिटे सुरुवातीला सुमारे 2500 ते 4000 रुपयांना विकली जात होती, मात्र आरोपींनी ती 25,000-50,000 रुपयांना विकली. (Ind vs Nz Semi Final Tickets)

“न्यूझीलंड विरुद्ध भारत विश्वचषक सामन्याचे तिकीट, (Ind vs Nz Semi Final Tickets) ज्याची किंमत सुमारे 2500 ते 4000 रुपये असेल, ते 25000-50000 रुपयांमध्ये विकले जात होते. ही माहिती मिळाल्यानंतर आमच्या पथकाने आरोपींशी संपर्क साधला आणि कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे “, असे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Air Pollution : दिल्ली, मुंबईसह पिंपरी-चिंचवडच्या हवेची गुणवत्ता खालावली)

तसेच तिकिटे (Ind vs Nz Semi Final Tickets) खरेदी करण्यासाठी केवळ अधिकृत संकेतस्थळांचा संदर्भ घ्यावा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

मुंबईत उद्या (15 नोव्हेंबर) होणाऱ्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला आहे. (Ind vs Nz Semi Final Tickets)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.