Ind Vs NZ Test Series : भारतीय फलंदाज डावखुऱ्या फिरकीच्या जाळ्यात कसे अडकले?

भारतीय खेळाडू फिरकीला खेळण्यात माहीर मानले जातात.

21
Ind Vs NZ Test Series : भारतीय फलंदाज डावखुऱ्या फिरकीच्या जाळ्यात कसे अडकले?
Ind Vs NZ Test Series : भारतीय फलंदाज डावखुऱ्या फिरकीच्या जाळ्यात कसे अडकले?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेटला जवळून पाहणाऱ्या आणि खासकरून सामने मैदानावर जाऊन पाहणाऱ्या लोकांना मुंबई कसोटीत एजाज पटेल विरुद्ध भारतीय खेळाडूंची परतीची रांग लागलेलं पाहायला अजिबात आवडलं नसणार. पारंपरिक दृष्ट्या भारतीय खेळाडू फिरकीला खेळण्यासाठी माहीर म्हणून ओळखले जातात. पण, यंदा न्यूझीलंड विरुद्ध वेगळंच चित्र पाहायला मिळालं. वॉशिंग्टन सुंदर वगळता, अश्विन आणि जाडेजाला लय सापडत नव्हती. पण, मिचेल सँटनर हा कामचलाऊ गोलंदाज पुण्यात भाव खाऊन गेला. तर मुंबईत एझाजने भारतीय फलंदाजांना लोळवलं. (Ind Vs NZ Test Series)

भारतीय मैदानांवर डावखुरे फिरकी गोलंदाज धावा रोखण्याचं काम करतात. त्यांचा बळी मिळवणारे गोलंदाज म्हणून फारसा वापर झाला नव्हता. यापूर्वी २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लार्कने ९ धावांत ६ बळी आणि ते ही वानखेडे मैदानावरच मिळवले होते. पण, त्या कसोटीत क्लार्क गोलंदाजीला येईपर्यंत लक्ष्मण आणि सचिनने खमकी फलंदाजी करून शतकी भागिदारी रचलेली होती. आणि क्लार्कने संघ गुंडाळला असला तरीही आघाडीच्या फलंदाजांच्या कामगिरीमुळे ती कसोटी भारतीय संघाने जिंकलीच. (Ind Vs NZ Test Series)

(हेही वाचा – Gautam Gambhir : पहिल्याच मालिकेनंतर गौतम गंभीरवर होणारी टीका योग्य आहे का?)

पण, मागच्या दशक भरात हे चित्र बदललेलं दिसतंय. २०१२ मध्ये भारताने आपली शेवटची मायदेशातील मालिका गमावली होती. आणि त्यावेळीही इंग्लंडसाठी डावखुरा गोलंदाज माँटी पानेसर हीरो ठरला होता. भारतात आतापर्यंत यशस्वी झालेले डावखुरे फिरकीपटू बघूया,

WhatsApp Image 2024 11 05 at 1.30.14 PM

या आकडेवारीतून मागच्या दहा वर्षातील डावखुऱ्या फिरकीपटूंची भारतातील कामगिरी दिसून येईल. व्हिटोरी २००० च्या सुरुवातीला भारता बळी मिळवण्यासाठी झगडताना दिसतो. तीच परिस्थिती माँटी पानेसरचीही सुरुवातीला होती. पण, २०१२ पासून चित्र बदललेलं दिसेल.

(हेही वाचा – उबाठाचे उमेदवार Sunil Raut यांना महिलेविषयीचे आक्षेपार्ह वक्तव्य भोवले; गुन्हा दाखल)

यात सगळ्यात मोठा बदल झाला आहे तो खेळपट्टी आणि डिसिजन रिव्ह्यू प्रणालीमुळे. भारताने न्यूझीलंड विरुद्ध वापरलेल्या तीनही खेळपट्ट्या पहिल्या दिवसापासून फिरकीला मदत करत होत्या. आणि अशावेळी वाहत्या गंगेत किवी गोलंदाजांनी हात धुवून घेतले आहेत. आणि दुसरा मोठा बदल आहे तो डीआरएसमुळे फलंदाजांच्या बदललेल्या शैलीचा.

टीव्ही रिप्ले बघता येत असल्यामुळे फलंदाज पूर्वी फिरकी खेळताना सरळ आपलं पॅड पुढे करून बचावात्मक फटका खेळायचे, ते तंत्र आता उपयोगी पडत नाही. प्रत्येक चेंडू हा खेळायलाच लागतो. त्यामुळे गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर फलंदाजी कठीण झाली आहे.

शिवाय नवीन फलंदाज हे टी-२० च्या युगात घडत आहेत. अगदी विराट आणि रोहितही टी-२० सुरू झालं तेव्हाच उदयाला आले. अशावेळी तंत्रातील चुका या नियमित बनत चालल्या आहेत. राहुल द्रविड (Rahul Dravid) सारखे तंत्रशुद्ध फलंदाज आता उदाहरण म्हणूनही दिसत नाहीत. न्यूझीलंड विरुद्ध विराट कोहलीही (Virat Kohli) पुण्यात शालेय क्रिकेटमध्येही खेळला नसेल असा खराब फटका खेळून बाद झाला. हे त्याचच उदाहरण आहे. सातत्याने फिरकी खेळायची असेल तर तंत्रात सुधारणा आवश्यक आहे. (Ind Vs NZ Test Series)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.