Ind vs NZ Test Series : न्यूझीलंड विरुद्घच्या कसोटी मालिकेसाठी जसप्रीत बुमरा भारताचा उपकर्णधार

142
Ind vs NZ Test Series : न्यूझीलंड विरुद्घच्या कसोटी मालिकेसाठी जसप्रीत बुमरा भारताचा उपकर्णधार
Ind vs NZ Test Series : न्यूझीलंड विरुद्घच्या कसोटी मालिकेसाठी जसप्रीत बुमरा भारताचा उपकर्णधार
  • ऋजुता लुकतुके 

भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या तीन कसोटींच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. सध्याचा संघच कायम असला तरी त्यात एक महत्त्वपूर्ण बदल आहे. तो म्हणजे जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) संघाचा उपकर्णधार आहे. या नंतरच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा एक सुरुवातीच्या दोन कसोटींपैकी एक कसोटी वैयक्तिक कारणांमुळे खेळणार नाहीए. अशावेळी त्या कसोटीसाठीही जसप्रीतच उपकर्णधार असेल हे आता स्पष्ट झालं आहे. (Ind vs NZ Test Series)

(हेही वाचा- Raj Thackeray Podcast : स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी मला एक संधी द्या, राज ठाकरेंचं आवाहन)

बाकी सध्याचा संघ कायम आहे. रोहित, शुभमन आणि यशस्वी यांच्यावर सलामीची जबाबदारी असेल. तर मधल्या फळीत विराट, के एल राहुल, सर्फराझ खान आणि रिषभ पंत यांच्यावर जबाबदारी असेल. तर ध्रुव जुरेल हा संघातील दुसरा यष्टीरक्षक असेल. आकाश दीपने तिसरा तेज गोलंदाज म्हणून विश्वास कायम ठेवला आहे. तर कुलदीप, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा हे फिरकीपटू संघात असतील. न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यातील तीन कसोटी बंगळुरू, पुणे आणि मुंबईत होणार आहेत. संघाबरोबर हर्षित राणा, नितिश कुमार रेड्डी, मयांक यादव आणि प्रसिध कृष्णन हे राखीव खेळाडू असतील. (Ind vs NZ Test Series)

न्यूझीलंड बरोबरच्या मालिकेसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमरा (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली (Virat Kohli), के एल राहुल, सर्फराझ खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज व आकाशदीप सिंग (Ind vs NZ Test Series)

(हेही वाचा- Eng VS Pak, Multan Test : पाकिस्तानने लाजिरवाण्या पराभवानंतर केले हे नकोसे विक्रम )

भारत वि न्यूझीलंड कसोटी मालिका 

क्रमांक

तारीख व पहिला दिवस

वेळ

ठिकाण

१ ली कसोटी

१६ ऑक्टोबर (रविवार)

सकाळी ९.३०

बंगळुरू

२ री कसोटी

२४ ऑक्टोबर (सोमवार)

सकाळी ९.३०

पुणे

३ री कसोटी

१ नोव्हेंबर (मंगळवार)

सकाळी ९.३०

मुंबई

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.