Ind vs NZ Test Series : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम साऊदीचा कर्णधारपदाचा राजीनामा

Ind vs NZ Test Series : सध्या टॉम लॅथम किवी संघाचं नेतृत्व करणार आहे 

133
Ind vs NZ Test Series : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम साऊदीचा कर्णधारपदाचा राजीनामा
Ind vs NZ Test Series : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम साऊदीचा कर्णधारपदाचा राजीनामा
  • ऋजुता लुकतुके 

न्यूझीलंड संधाचा नुकताच श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत दारुण पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून कर्णधार टीम साऊदीने (Tim Southee) राजीनामा दिला आहे. त्यामुळे भारताविरुद्धची मालिका समोर असताना किवी संघासमोर पेच निर्माण झाला होता. त्यावर तोडगा काढत सध्या नेतृत्व टॉम लॅथमकडे सोपवण्यात आलं आहे. २०२२ मध्ये केन विल्यमसनच्या जागी कर्णधार म्हणून टीम साऊदीची निवड झाली होती. त्यानंतर १४ कसोटींत त्याने किवी संघाचं नेतृत्व केलं. यातील ६ कसोटी त्यांनी जिंकल्या. तर ६ गमावल्या. दोन अनिर्णित राहिल्या. (Ind vs NZ Test Series)

(हेही वाचा- Pune News: पुण्यात नवरात्रौत्सवानिमित्त वाहतुकीत बदल! ‘हे’ रस्ते राहणार बंद)

श्रीलंकेविरुद्ध न्यूझीलंड संघाने एक चुरशीची कसोटी गमावली. दुसऱ्या कसोटीत तर त्यांचा डावाने पराभव झाला. त्यामुळे किवी संघाची पराभवाची मालिका ४ कसोटींवर पोहोचली. मध्ये गुरुग्राम इथं प्रस्तावित अफगाणिस्तान विरुद्धची कसोटी पावसात वाहून गेली होती. पराभवाच्या या धक्क्यांनंतर टीम साऊदीने नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. ‘कसोटी क्रिकेट माझं खास आवडीचं आहे. कसोटीत न्यूझीलंड संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, हा माझा बहुमानच समजतो. मी कायमच संघाच्या कामगिरीला जास्त महत्त्व देत आलो आहे. आताही मला तेच करावंसं वाटतं. संघाचं हित लक्षात घेऊन मी कप्तानीपासून बाजूला व्हावं असं मला वाटतं. मला जे चांगलं जमतं ते करण्याचा मी प्रयत्न करेन. संघासाठी बळी मिळवेन. आणि विजय मिळवण्याचा प्रयत्न करेन,’ असं टीम साऊदी म्हणाला. (Ind vs NZ Test Series)

न्यूझीलंडच्या कामगिरीबरोबरच टीम साऊदीचा (Tim Southee) स्वत:चा फॉर्मही सध्या बिघडलेला आहे. गेल्या ८ कसोटींत मिळून त्याने फक्त १२ बळी मिळवले आहेत. त्यामुळे भारत दौऱ्यासाठी त्याची किवी संघात नक्की निवड होते का, असाही एक प्रश्न होता. त्यापूर्वीच साऊदीने उत्तर शोधायचा प्रयत्न केला आहे. साऊदी ४०० कसोटी बळींपासून फक्त १८ बळी दूर आहे. आणि ४०० बळी घेणारा इयॉन हॅडलीनंतर तो फक्त दिसरा किवी गोलंदाज असेल. (Ind vs NZ Test Series)

(हेही वाचा- Anurag Thakur म्हणाले- काँग्रेसची आश्वासने खोटी; ते दंगलखोर-खंडणीखोरांच्या भरोवशावर)

टॉम लॅथमची कसोटीत देशाचं नेतृत्व करण्याची ही दुसरी वेळ असेल. यापूर्वी २०२० ते २०२२ मध्ये ८ कसोटींत त्याने संघाचं नेतृत्व केलं आहे. (Ind vs NZ Test Series)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.