Ind vs NZ : विराट, श्रेयसची शतकं, भारताचं न्यूझीलंडसमोर ३९८ धावांचं आव्हान

विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यांत भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर ३९७ धावांचा डोंगर उभा केला आहे. विराटचं विक्रमी ५० वं एकदिवसीय शतक आणि श्रेयसचं लागोपाठ दुसरं शतक हे भारतीय डावाचं वैशिष्ट्यं ठरलं. 

141
Ind vs NZ : विराट, श्रेयसची शतकं, भारताचं न्यूझीलंडसमोर ३९८ धावांचं आव्हान
Ind vs NZ : विराट, श्रेयसची शतकं, भारताचं न्यूझीलंडसमोर ३९८ धावांचं आव्हान
  • ऋजुता लुकतुके

विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यांत भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर ३९७ धावांचा डोंगर उभा केला आहे. विराटचं विक्रमी ५० वं एकदिवसीय शतक आणि श्रेयसचं लागोपाठ दुसरं शतक हे भारतीय डावाचं वैशिष्ट्यं ठरलं. (Ind vs NZ)

विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवून दिला. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर निर्धारित पन्नास षटकांत भारताने ३९७ धावांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३९८ धावांचं मोठं आव्हान उभं आहे. (Ind vs NZ)

विराट कोहलीचं विक्रमी ५० वं शतक आणि श्रेयस अय्यरने विश्वचषक स्पर्धेत केलेलं लागोपाठ दुसरं शतक याच्या जोरावर भारतीय संघाने ही मजल मारली. विराटने अखेर आपलं ५० वं शकत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीतच साजरं केलं. ११३ चेंडूंत ११७ धावा करताना त्याने २ षटकार आणि ९ चौकार ठोकले. फलंदाजीचे अनेक विक्रम यावेळी मोडीत निघालेच. पण, त्याहून महत्त्वाचं म्हणजे श्रेयस अय्यरच्या साथीने त्याने दुसऱ्या गड्यासाठी दीडशे धावांची भागिदारी केली आणि भारताला चारशेचा धावांच्या जवळ नेण्यात मोठी भूमिका बजावली. (Ind vs NZ)

विराटच्या बरोबरीने घरच्या मैदानावर खेळताना श्रेयस अय्यरनेही आपला जलवा दाखवला. श्रीलंकेविरुद्ध त्याने याच मैदानावर सहा षटकारांची आतषबाजी केली होती. आजही तो इथं षटकारांचीच भाषा बोलत होता. श्रेयसने एकूण ८ षटकार आणि ४ चौकार लगावत ७० चेंडूत १०४ धावा केल्या. भारतीय डावाच्या ४९ व्या षटकांत टीम साऊदीला आणखी एक षटकार खेचण्याच्या प्रयत्नांत तो सीमारेषेजवळ झेलबाद झाला. (Ind vs NZ)

(हेही वाचा – Ind vs NZ : विराट कोहलीचं ५० वं शतक!)

त्यापूर्वी नाणेफेक जिंकल्यापासून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी फटकेबाजी सुरू केली. रोहित शर्मा नेहमीसारखाच फटकेबाजीच्या मूडमध्ये होता आणि २९ चेंडूंत ४७ धावा करताना त्याने ४ षटकार आणि ४ चौकार लगावले. नेहमीप्रमाणे खणखणीत वेगवान अशी ७१ धावांची सलामी दोघांनी दिली. मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहित बाद झाला. पण, त्याची जागा शुभमन गिलने घेतली आणि त्याने मोठे फटके खेळणं सुरूच ठेवलं. शुभमन आणि विराटनेही दुसऱ्या गड्यासाठी ९३ धावांची भागिदारी केली होती. पण, शुभमन ७३ धावांवर असताना त्याच्या मांडीचा स्नायू दुखावला आणि त्याला दुखापतीमुळे पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. (Ind vs NZ)

शुभमन परतल्यावर घऱच्या मैदानावार श्रेयसने विराटच्या साथीने १६३ धावांची भागिदारी केली. या भागिदारीने भारताची चारशे धावांची पायाभरणी केली. अखेर श्रेयस १०५ धावांवर बाद झाला आणि डावाच्या शेवटी के एल राहुल ३९ तर दुखापतीनंतर पुन्हा मैदानात आलेला शुभमन ८० धावांवर नाबाद राहिले. न्यूझीलंडचे तेज तसंच फिरकी गोलंदाजही या सामन्यांमत निष्प्रभ ठरले. साऊदी आणि बोल्ट या दोन प्रमुख गोलंदाजांनी आपल्या दहा षटकांत प्रत्येकी १०० धावा दिल्या. इथंच सामन्याचं चित्र स्पष्ट होतं. (Ind vs NZ)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.