ऋजुता लुकतुके
आशिया चषक स्पर्धेत आज म्हणजेच शनिवार २ सप्टेंबर रोजी (IND vs PAK Asia Cup) भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार आहे. एकीकडे संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील या सामन्याकडे लागलं आहे. तर दुसरीकडे मात्र सामन्याच्या एक दिवस आधी दोन्ही संघातील खेळाडू शांत आणि एकमेकांशी हास्यविनोद करतांना दिसले आहेत.
यापूर्वी टी-२० विश्वचषकात भारत आणि पाक संघ आमने सामने आले तेव्हा (IND vs PAK Asia Cup) विराट कोहली आणि पाक तेज गोलंदाज हॅरिस रौफ यांच्यात जुगलबंदी रंगली होती. रौफला विराटने मारलेला लॉफ्टेट फटका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. आताही दोघांमधली जुगलबंदी बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण, तेच दोन खेळाडू सामन्याच्या पूर्वी शुक्रवारी एकमेकांशी गप्पा मारतांना दिसले.
(हेही वाचा – GST Collection : ऑगस्ट महिन्यात 1,59,069 कोटींचा एकूण जीएसटी जमा)
श्रीलंकेत पल्लीकल इथं शुक्रवारी भारत आणि पाक (IND vs PAK Asia Cup) खेळाडूंचं सराव सत्र एकाच वेळी होतं. तिथे रोहीत शर्मा पाक कर्णधार बाबर आझमशी गंभीर चर्चा करताना दिसला. पाकिस्तान क्रिकेटने सराव सत्राचा एक व्हीडिओ ट्विट केला आहे. त्यामध्ये विराट कोहली आधी रौफशी आणि त्यानंतर शाहीन आफ्रिदी तसंच शदाब खानशी गप्पा मारताना दिसतोय.
Pakistan and India players meet up ahead of Saturday’s #PAKvIND match in Kandy ✨#AsiaCup2023 pic.twitter.com/iP94wjsX6G
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 1, 2023
भारत आणि पाकिस्तानचे संघ आशिया चषकात (IND vs PAK Asia Cup) यापूर्वी १३ वेळा आमने सामने आले आहेत. यापैकी भारताने ७ सामने जिंकले आहेत, पाकिस्तानने ५ तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन संघांमध्ये शेवटचा मुकाबला टी-२० विश्वचषकात २०२२ मध्ये झाला होता. या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक ठोकलं होतं. भारतीय संघाने हा सामना ४ गडी राखून जिंकला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community