IND vs PAK Asia Cup : पावसामुळे रंगाचा बेरंग, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द

सामना रद्द झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

142
IND vs PAK Asia Cup : पावसामुळे रंगाचा बेरंग, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द

आशिया चषक स्पर्धेत काल म्हणजेच शनिवार २ सप्टेंबर रोजी (IND vs PAK Asia Cup) भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना खेळला गेला. मात्र पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. आशिया चषकातील भारताचा पहिलाच सामना पावसामुळे रद्द झाल्याने क्रिकेट प्रेमींच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. रात्री १० वाजेपर्यंत पंचांनी पाऊस थांबण्याची वाट पाहिली. मात्र पाऊस न थांबल्याने अखेर पंचांनी सामना रद्द केला. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आले आहे. पाकिस्तान संघाने नेपाळचा पराभव करत दोन गुणांची कमाई केली होती. पाकिस्तान संघाने आता तीन गुणांसह सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे.

(हेही वाचा – Bhiwandi Building Collapses : भिवंडीत दोन मजली इमारत कोसळली, दोन जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी)

भारतीय संघासाठी आता ‘करो या मरो’

भारताने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर (IND vs PAK Asia Cup) २६७ धावांचे आव्हान दिले होते. सुपर ४ मध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला नेपाळविरोधात विजय अनिवार्य आहे. भारतीय संघाने नेपाळचा पराभव केला अथवा पावसामुळे सामना रद्द झाला तरच भारताचे आशिया चषकातील आव्हान कायम राहणार आहे. नेपाळने जर भारताचा पराभव केला तर भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

अशातच भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK Asia Cup) यांच्यातील सामना रद्द झाल्यानंतर काही चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरु झाला आहे.

हेही पहा – 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.