Ind vs Pak : भारत – पाक सामन्यादरम्यान पावसाची शक्यता

भारत - पाक सामन्याची उत्सुकता सगळ्यांना आहे. पण, सामन्यादरम्यान अहमदाबादमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे

109
Ind vs Pak : भारत - पाक सामन्यादरम्यान पावसाची शक्यता
ऋजुता लुकतुके

विश्वचषकातील सगळ्यात हाय-प्रोफाईल सामना (Ind vs Pak) म्हणून १४ ऑक्टोबरच्या भारत – पाक लढतीकडे पाहिलं जात आहे. नवरात्री सुरू होण्यापूर्वी एक दिवस आधी होणारा हा सामना षटकार, चौकारांची उधळण करणारा होवो अशीच चाहत्यांची अपेक्षा आहे. पण, हवामान खात्याने उत्तर गुजरातमध्ये या काळात हलकासा पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

त्यामुळे धावांबरोबरच इथं पावसाची बरसात (Ind vs Pak) होण्याची शक्यता आहे. उत्तर गुजरातमधील जिल्ह्यांमध्ये आणि अहमदाबाद शहरात १४ आणि १५ ऑक्टोबरला पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अहमदाबादमधील हवामान खात्याचे अधिकारी मनोरमा मोहांती याविषयी बोलताना म्हणाल्या की, नवरात्रीच्या पूर्वी शहरात वातावरण ढगाळ राहील आणि काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात.

सध्या मात्र शहरात अत्यंत कोरडं हवामान आहे. दोन्ही संघांनी आपला सरावही सुरू केला आहे. भारत आणि पाकिस्तानचे (Ind vs Pak) संघ विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सात वेळा आमने सामने आले आहेत. आणि यातले सातही सामने भारताने जिंकले आहेत. अलीकडे आशिया चषकातही भारतीय संघाने पाकिस्तानवर दोनदा मात केली आहे. यातील सुपर फोरचा दुसरा सामना तर भारताने २२० धावांनी जिंकला होता.

(हेही वाचा – Ind vs Pak Shubman Gill : शुभमन गिल मैदानात परतल्यामुळे भारतीय गोटात आनंदाचं वातावरण)

विश्वचषकाच्या (Ind vs Pak) पहिल्या दोन सामन्यांत मात्र पाकिस्तानने फलंदाजी आणि गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. दोन्ही संघांचे सध्या दोन सामन्यातून ४ गुण झाले आहेत. पण, सरस धावगतीच्या आधारे भारतीय संघ पाकच्या पुढे तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे.

पाक संघ – बाबर आझम (कर्णधार), शदाब खान, फखर झमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, महम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिकार अहमद, सलमान अली आघा, महम्मद नवाझ, उझमा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, महम्मद वसिम (Ind vs Pak)

भारतीय संघ – रोहीत शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, महम्मद शामी, महम्मद सिराज, शार्दूल ठाकूर (Ind vs Pak)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.