ऋजुता लुकतुके
भारतीय टेनिस संघाला पाकिस्तानविरुद्धचा (Ind vs Pak Davis Cup Tie) डेव्हिस चषक सामना सोडून द्यावा लागणार अशीच चिन्ह आहेत. कारण, हा सामना त्रयस्थ देशात खेळवण्याची भारताची मागणी आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेनं फेटाळली आहे. आणि पाकिस्तानमध्ये खेळायचं झाल्यास देशातील कुठल्याही संघटनेला सध्या केंद्रसरकारची परवानगी लागते. ती अजून मिळालेली नाही.
गुरुवारी (२९ डिसेंबर) भारतीय टेनिस (Ind vs Pak Davis Cup Tie) संघटनेनं पाक विरुद्ध सामन्याविषयी वस्तुस्थिती सांगितली. त्यानुसार, भारतीय संघाने पाकिस्तानला प्रवास करावा की नाही, यासाठी संघटनेनं केंद्रसरकारची परवानगी मागितली आहे. आणि ती अजून प्रलंबित आहे. डेव्हिस चषकाचा सामना ३ आणि ४ फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये होणार आहे.
(हेही वाचा-WFI Suspension : कुस्ती फेडरेशनच्या निलंबनाविरोधात संजय सिंग कोर्टात दाद मागणार )
जागतिक गटातील पहिल्या फेरीचा हा सामना आहे. पण, वेळेवर सरकारची परवानगी न मिळाल्यास आणि त्यानंतर खेळाडूंचा व्हिसा आणि इतर प्रक्रिया वेळेवर झाली नाही, तर भारतीय संघाला हा सामना सोडून देण्यावाचून पर्याय उरणार नाही. मूळात केंद्रसरकार खेळाडूंना पाकिस्तानला पाठवायला तयार होईल का, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे.
दोन देशांमधील संबंध ताणलेले असल्यामुळे दोन्ही देशांचे संघ आपापसात फारसे खेळलेले नाहीत. क्रिकेट हा दोन्ही देशांतील लाडका खेळ आहे. पण, या खेळातही मागच्या दहा वर्षांत एकही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. भारतीय संघाने तर पाकचा शेवटचा दौरा केलाय तो २००८ साली. त्यानंतर दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्येच त्रयस्थ देशात एकमेकांशी भिडतात.
यावर्षी आशिया चषकासाठी भारतीय संघाने पाकचा दौरा करायला नकार दिला होता. त्यानंतर दोन देशांमधील सामने हे श्रीलंकेला हलवण्यात आले. तर त्यानंतर ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यासाठी मात्र पाकचा संघ भारतात आला होता.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community