Ind vs Pak : भारताच्या पाकिस्तान विरुद्धच्या लढती दरम्यान अहमदाबादला येणार छावणीचं स्वरुप, ११,००० सुरक्षा सैनिक तैनात करणार 

भारत वि. पाकिस्तान सामन्या दरम्यान सुरक्षेसाठी ११,००० सुरक्षा सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. गुजरात पोलिसांना या कामी राष्ट्रीय सुरक्षा दल तसंच राखीव दलाचीही मदत मिळणार आहे

130
Ind vs Pak : भारताच्या पाकिस्तान विरुद्धच्या लढती दरम्यान अहमदाबादला येणार छावणीचं स्वरुप, ११,००० सुरक्षा सैनिक तैनात करणार 
Ind vs Pak : भारताच्या पाकिस्तान विरुद्धच्या लढती दरम्यान अहमदाबादला येणार छावणीचं स्वरुप, ११,००० सुरक्षा सैनिक तैनात करणार 

ऋजुता लुकतुके

येत्या १४ ऑक्टोबरला होणारा भारत वि. पाकिस्तान (Ind vs Pak) हा सामना या विश्वचषक स्पर्धेतील सगळ्यात महत्त्वाचा सामना आहे. आणि त्यासाठी अहमदाबाद शहर सज्ज झालं आहे. मागच्या काही वर्षांत भारत – पाक संघादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. पण, खबरदारीचा उपाय म्हणून या सामन्याच्या वेळी शहरात ११,००० सुरक्षा सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. गुजरात पोलिसांना राष्ट्रीय सुरक्षा दर, होम गार्ड तसंच केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचंही सहकार्य मिळणार आहे.

या सामन्यानंतर लगेचच नवरात्रीचा सण सुरू होतोय. त्यामुळे शहरात अतिरिक्त काळजी घेण्यात येत आहे. ‘अहमदाबाद शहराने मागच्या २० वर्षांत क्रिकेट सामन्या दरम्यान जातीय तणाव अनुभवलेला नाही. पण, खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व संवेदनशील क्षेत्रात सामन्याच्या दिवशी सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत,’ अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी एस मलिक यांनी पीटीआयशी बोलताना हे स्पष्ट केलं आहे.

या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी काही धमक्या पोलिसांना आल्या आहेत. आणि त्यासाठी हा बंदोबस्त असल्याचं पीटीआयने म्हटलंय. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनीही सोमवारी गुजरात पोलिसांशी चर्चा करून सामन्या दरम्यानच्या सुरक्षा व्यवस्थचा आढावा घेतला. त्यानंतर जी एस मलिक यांनी संध्याकाळी पत्रकारांनाही माहिती दिली.

(हेही वाचा-Ladakh Avalanche : भारतीय सैन्य दलाच्या एका जवानाचा मृत्यू तर तीन बेपत्ता

‘मुंबई पोलिसांना ईमेलने सामन्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना इजा पोहोचवण्याची धमकी आली होती. ईमेलची चौकशी सध्या सुरूच आहे. शिवाय आम्ही सामन्याच्या दिवशीचा बंदोबस्तही केला आहे. सामन्याच्या दिवशी एक लाखांच्या वर लोक स्टेडिअममध्ये असतील. त्यांच्या सुरक्षेसाठी ४ आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ४,००० पोलिसांचं दक्षता पथक मैदानात आणि शहरात जागोजागी तैनात असेल,’ असं मलिक यांनी पत्रकारांना सांगितलं.

या शिवाय गुजरात पोलिसांचं राखीव दल, होमगार्ड आणि शीघ्रकृती दलाची मदतही घेतली जाणार आहे. धमकीचा निवावी ईमेल परदेशातून आल्याचं सिद्ध झालं आहे. सामन्या दरम्यान स्टेडिअम आणि क्रिकेट चाहते कुठलाही बाँब हल्ला, आत्मघातकी हल्ला इतकंच काय तर अणूहल्ल्यापासून सुरक्षित राहतील अशा प्रकारचा बंदोबस्त गुजरात पोलीस करत आहेत. त्यासाठी बाँब शोधक पथकंही इथं तैनात करण्यात आली आहेत. प्रेक्षकांची कसून तपासणीही होणार आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.