IND vs PAK Hockey 5s Match : आशिया कपमध्ये पाकिस्तानला नमवत भारत विजयी; पंतप्रधान मोदींनी केले संघाचे अभिनंदन

208
IND vs PAK Hockey 5s Match : आशिया कपमध्ये पाकिस्तानला नमवत भारत विजयी; पंतप्रधान मोदींनी केले संघाचे अभिनंदन

एकीकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा श्रीलंकेच्या कॅंडीवर होत्या, जिथे भारत आणि पाकिस्तानचे संघ एकदिवसीय आशिया कपमध्ये आमनेसामने होते. तो सामना पावसामुळे रद्द झाला. दरम्यान, दुसरीकडे (IND vs PAK Hockey 5s Match) हॉकी 5s पुरुष आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू होता. यामध्ये भारतीय हॉकी संघाने चमकदार कामगिरी करत विजयाची नोंद केली.

हॉकी 5s म्हणजे काय?

हॉकी 5s फॉरमॅटमध्ये (IND vs PAK Hockey 5s Match) अंतिम फेरीत केवळ ५ खेळाडू खेळतात. भारताकडून मनदीप मोर (कर्णधार), सूरज करकेरा, जुगराज सिंग, मनिंदर सिंग आणि पवन राजभर हे पाच खेळाडू खेळले. हा सामना खूपच रोमांचक होता. सुरुवातीला पाकिस्तानचे ३ गोल होते तर भारताचे २ गोल होते. भारत एका गोलने पिछाडीवर होता, मात्र अखेरच्या क्षणांमध्ये भारताने १ गोल करत गुणसंख्या ४ – ४ अशी बरोबरीत आणली.

यानंतर पेनल्टी शूटआऊटद्वारे (IND vs PAK Hockey 5s Match) सामनाचा निकाल लागला. पेनल्टी शूट-आऊटमध्ये भारताने पाकिस्तानचा २ – १ ने पराभव केला. हा विजय मिळवला आणि स्पर्धाही जिंकली. आता भारतीय हॉकी संघ 5s हॉकी विश्वचषक २०२४ साठी पात्र ठरला आहे.

(हेही वाचा – IND vs PAK Asia Cup : पावसामुळे रंगाचा बेरंग, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द)

पुरुषांच्या हॉकी5 आशिया चषक स्पर्धेचे (IND vs PAK Hockey 5s Match) विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी ट्विटरवर लिहले आहे की;

“हॉकी5 आशिया चषक स्पर्धेचे विजेते! भारतीय पुरुष हॉकी (IND vs PAK Hockey 5s Match) संघांचे एका अविस्मरणीय विजयाबद्दल अभिनंदन. हा विजय म्हणजे आपल्या खेळाडूंचा दृढनिश्चय आणि समर्पित वृत्तीचा दाखला आहे. या विजयामुळे पुढल्या वर्षी ओमानमध्ये होणाऱ्या हॉकी5 विश्वचषकासाठी देखील आपण पात्र ठरलो आहोत. आपल्या खेळाडूंचे धैर्य आणि निर्धार आपल्या देशाला प्रेरित करत राहील.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.