Asian Games 2023 : हॉकीमध्ये टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी, पाकिस्तानचा दणदणीत पराभव

हॉकीत भारताने पाकिस्तानवर मिळवलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे.

168
Asian Games 2023 : हॉकीमध्ये टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी, पाकिस्तानचा दणदणीत पराभव
Asian Games 2023 : हॉकीमध्ये टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी, पाकिस्तानचा दणदणीत पराभव

आशियाई क्रीडा २०२३  (Asian Games 2023)च्या १९ व्या हंगामात भारतीय पुरुष संघाने हॉकीमध्ये (Hockey) पाकिस्तानी संघाचा पराभव केला आहे. पूल सामन्यात भारताने १०-२ असा विजय मिळवला. भारतीय संघाने सुरुवाती पासूनच पाकिस्तानवर पूर्णपणे वर्चस्व राखले. भारताने पूर्वार्धात ४ गोल केले, तर उत्तरार्धात ६ गोल झाले. हॉकीत भारताने पाकिस्तानवर मिळवलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. (Asian Games 2023)

पाकिस्तानच्या स्कोअरवर नजर टाकली तर, त्यांच्या खेळाडूंना पहिल्या हाफमध्ये एकही गोल करता आला नाही आणि दुसऱ्या हाफमध्येही ते केवळ २ गोल करू शकले आणि ते मागे पडले.पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगने भारतासाठी सर्वाधिक ४ गोल केले. वरुणलाही २ गोल करण्यात यश आले. (Asian Games 2023)

(हेही वाचा : Sudhir Mungantiwar : वाघनख करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार रविवारी होणार लंडनला रवाना)

याशिवाय समशेर, मनदीप, ललित आणि सुमित यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताने सामन्याच्या शेवटच्या सत्रात आपली लय कायम ठेवत आणखी ३ गोल केले आणि १०-२ अशा फरकाने सामना संपवला. या सामन्यात पाकिस्तानी संघाकडून अनेक लहान चुकाही दिसून आल्या. आता भारताला अ गटातील शेवटचा सामना बांगलादेश संघाविरुद्ध खेळायचा आहे.

(हेही पहा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.