-
ऋजुता लुकतुके
भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू क्रिकेट असो किंवा हॉकी, एकमेकांच्या समोर येणार असतील तर त्या सामन्याची चर्चा तर असतेच. शिवाय मैदानातील वातावरणही तणावग्रस्त असतं. चीनमधील चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतही तोच अनुभव आला. सामना तर चुरशीचा झालाच. भारत २-१ अशा आघाडीवर असताना पाकिस्तानचे गोल करण्याचे निकराचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे सामनाही रंगतदार वळणावर होता. अशावेळी अचानक सामन्याची १० मिनिटं बाकी असताना खेळाडूंमधील भांडणाचा तो प्रसंग उद्भवला. (Ind vs Pak Hockey Match)
(हेही वाचा- नोव्हेंबरच्या कोणत्या दिवशी होणार निवडणुका ? CM Eknath Shinde यांनी दिला जागा वाटपावर अपडेट!)
पाकच्या वाहिद अश्रफ राणाच्या (Ashraf Rana) खांद्याचा धक्का भारताच्या जोगराज सिंगला बसला. जोगराज मैदानावर कोसळला. त्याने हा धक्का जाणून बुजून केल्याचा भारताचा आरोप होता. कर्णधार हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) तातडीने मध्ये पडला. त्याने वहीदला तसं विचारलंही. त्यामुळे काही मिनिटं गोंधळ उडाला होता. अखेर पंचांनी वाहीदला पिवळं कार्ड दाखवलं. त्यानंतर वातावरण काहीसं शांत झालं. (Ind vs Pak Hockey Match)
Players clash during India vs Pakistan Hockey 🏑 match of Asian Champions Trophy. 🇮🇳v🇵🇰@jarmanpreet04 @13harmanpreet @manpreetpawar07 @iSunilTaneja @vikrantgupta73 @razi_haider #INDvPAK #Hockey #HockeyIndia #ACT24 pic.twitter.com/8mHLGKnP8s
— Harsh Tegta (@iamharshtegta) September 14, 2024
तोपर्यंत भारतीय खेळाडू मैदानात एकत्र जमून पंचांकडे दाद मागत होते. तर पाकचे खेळाडू मध्ये पडल्यावर आपापसातील वादही सुरू झाले. या सामन्यात भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर २-१ ने विजय मिळवला. साखळीमध्ये भारताने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. आता उपान्त्य फेरीतही दिमाखात प्रवेश केला आहे. (Ind vs Pak Hockey Match)
(हेही वाचा- नोव्हेंबरच्या कोणत्या दिवशी होणार निवडणुका ? CM Eknath Shinde यांनी दिला जागा वाटपावर अपडेट!)
पाक विरुद्ध भारताचे दोन्ही गोल हे पेनल्टी कॉर्नरवर झाले. हरमनप्रीतनेच ते केले. सामन्यातील पहिला गोल मात्र पाकिस्तानने केला. आठव्या मिनिटालाच हनान शहीदने रचलेल्या एका अप्रतिम चालीवर अहमद नदीमने गोल करत पाकिस्तानला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर खेळाचा वेग एकदम वाढला. कारण, भारतीय खेळाडूंनी गोल करण्याचा प्रयत्न सुरू केला. दोन्ही संघ आक्रमक होते. त्यामुळे मैदानावर रंगतदार हॉकी बघायला मिळाली. सतत उतार चढावांमुळे सामना झालीही चुरशीचा. पण, पाकिस्ताने पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची हातोटी दाखवली नाही. त्यामुळे त्यांचा पराभव झाला. (Ind vs Pak Hockey Match)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community