IND VS PAK : हार्दिक चेंडूवर पुटपुटला आणि इमामचा गेला बळी

102

पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणाऱ्या भारतीय संघाने सुरुवातीच्या षटकांमध्येच सामन्यावर पकड मिळवली. अब्दुल्ला शफिक आणि इमाम उल हक या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडण्यात टीम इंडियाला यश आल. मोहम्मद सिराजने अब्दुल्ला शफिक तर हार्दिक पांड्याने इमाम उल हकची विकेट काढली आहे. अब्दुल्ला शफिक आणि इमाम उल हक यांनी पाकिस्तानला सावध सुरुवात करून दिली.

IND VS PAK दरम्यानच्या सामन्यात ही जोडी भारताची डोकेदुखी वाढवण्याची चिन्हे दिसत असतानाच मोहम्मद सिराजचा यष्ट्यांच्या दिशेने येणारा एक वेगवान चेंडू शफिकच्या पायावर आदळला आणि भारतीय संघाने केलेले अपील उचलून धरत पंचानी शफिक बाद असल्याचा निर्णय दिला. शफिक २० धावा काढून माघारी परतला. त्यानंतर बाबर आझम आणि इमाम उल हक यांनी मोर्चा सांभाळला. इमामने काही चांगले फटकेही खेळले. मात्र १३ व्या षटकात हार्दिक पांड्याने इमामचे काम तमाम करताना त्याला यष्टीमागे लोकेश राहुलकडे झेल देण्यास भाग पाडले. इमाम उल हकने ३८ चेंडूत ३६ धावांची आक्रमक खेळी केली.  यादरम्यानची उल्लेखनीय बाब म्हणजे  बाद होण्याआधी आदल्याच चेंडूवर इमाम उल हकने हार्दिक पांड्याला खणखणीत चौकार ठोकला होता. मात्र पुढचा चेंडू टाकण्याआधी हार्दिक पांड्या चेंडू तोंडाजवळ घेऊन काहीतरी पुटपुटला. आश्चर्य म्हणजे त्याच चेंडूवर इमाम राहुलकडे झेल देत बाद झाला.

(हेही वाचा Israel-Palestine Conflict : सौदी अरेबियाने इस्रायलसोबतची चर्चा थांबवली; युद्धाचा परिणाम )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.