-
ऋजुता लुकतुके
यावर्षी क्रिकेट हंगामाची सुरुवात झाल्यापासून पाकिस्तान आणि भारतीय संघ पुरेसं एकदिवसीय क्रिकेट खेळल्या आहेत. आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकासाठी दोन्ही संघांमध्ये चुरसही होती. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांची कामगिरी तुल्यबळ झाली आहे. दोघांनीही धावसंख्येचा पाठलाग करताना मोठे विजय मिळवले आहेत. तसंच या हंगामातही दोघांची कामगिरी चांगली आहे. (Ind vs Pak)
पाकिस्तानचा संघा यावर्षी मे महिन्यात न्यूझीलंडबरोबर खेळला. त्यानंतर संघाने श्रीलंकेचा दौरा केला. आणि यात अफगाणिस्तानच्या संघाबरोबरही त्यांची एक एकदिवसीय मालिका झाली. त्यानंतर आशिया चषकात त्यांनी नेपाळ, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला. मात्र भारताने दोनही सामन्यांत त्यांना हरवलं. इथं पाक संघाला अंतिम फेरीही गाठता आली नाही. (Ind vs Pak)
त्यानंतर विश्वचषकाच्या सराव सामन्यात न्यूझीलंडने पाकचा पराभव केला होता. पण, त्यानंतर एक सराव सामना आणि दोन सलग मुख्य सामने पाक संघाने जिंकले आहेत. तर भारतीय संघाने विश्वचषक सुरू होण्यापूर्वी आशिया चषक जिंकलाय. तसंच वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकांमध्येही विजय मिळवलाय. त्यामुळे विश्वचषक सुरू होताना भारतीय संघच एकदिवसीय क्रमवारीत अव्वल आहे. (Ind vs Pak)
दोन्ही सघांचा तुलनात्मक अभ्यास केला तर २०२३ मध्ये दोघांची यशाची टक्केवारी ही ७० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
(हेही वाचा – Mahadev Book Application : महादेव बुक अँपच्या प्रवर्तकांची अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत हातमिळवणी)
दोन्ही संघांची एकदिवसीय क्रिकेटमधील आतापर्यंतची कामगिरी पाहिली तरी दोघांमध्ये डावं, उजवं करणं कठीण आहे.
विश्वचषक स्पर्धेचा इतिहास पाहिला तर दोन्ही संघ आतापर्यंत सातवेळा एकमेकांसमोर आले आहेत आणि इथं मात्र भारतीय संघाची यशाची टक्केवारी शंभर टक्के आहे. कारण, भारताने पाक विरुद्ध सातही सामने जिंकले आहेत. २०१९ च्या विश्वचषकात दोन्ही संघ शेवटचे आमने सामने आले होते आणि इथंही मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने ८९ धावांनी विजय मिळवला होता. (Ind vs Pak)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community