Ind vs Pak : पाक बोर्डाच्या अध्यक्षांनी मीडिया आणि चाहत्यांना भारतीय व्हिसा मिळत नसल्याची तक्रार परराष्ट्र मंत्रालयाकडे केली

पाक क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झका अश्रफ भारतावर सध्या नाराज आहेत. आणि मीडिया प्रतिनिधी तसंच चाहत्यांना भारताचा व्हिसा वेळेवर मिळत नसल्याची तक्रार आता त्यांनी पाक सरकारकडेच थेट केली आहे. 

110
Ind vs Pak : पाक बोर्डाच्या अध्यक्षांनी मीडिया आणि चाहत्यांना भारतीय व्हिसा मिळत नसल्याची तक्रार परराष्ट्र मंत्रालयाकडे केली
Ind vs Pak : पाक बोर्डाच्या अध्यक्षांनी मीडिया आणि चाहत्यांना भारतीय व्हिसा मिळत नसल्याची तक्रार परराष्ट्र मंत्रालयाकडे केली

ऋजुता लुकतुके

पाकिस्तानी क्रिकेट संघ (Ind vs Pak) विश्वचषकासाठी भारतात यायला निघाला तेव्हा एकदा असंच वातावरण तयार झालं होतं. खेळाडूंना भारतीय व्हिसा मिळवण्यात अडचणी आणि दिरंगाई होत असल्याची तक्रार पाक क्रिकेट बोर्डाने केली होती. आयसीसीने तेव्हा या प्रकरणात मध्यस्थी केली होती. त्यानंतर पाक संघ भारतात येऊन आठवडा झाला.

त्यानंतरही पाक मीडिया प्रतिनिधी आणि क्रिकेट सामन्यांची ऑनलाईन तिकीटं खरेदी करणारे प्रेक्षक भारतात येऊ शकले नसल्याची पाक बोर्डाची तक्रार आहे. मंडळाचे अध्यक्ष झका अश्रफ आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी सोमवारी पाकचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सज्जद काझी यांना भेटले.

पाक बोर्डाने याविषयी काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, ‘पाक मीडिया प्रतिनिधी आणि क्रिकेट चाहत्यांना भारतीय व्हिसा मिळवण्यात येणाऱ्या अडचणी बघून आम्ही नाराजी व्यक्त करत आहोत. आम्हाला यजमान देश भारताला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायची आहे. स्पर्धेसाठी येऊ इच्छिणाऱ्या लोकांना वेळेत व्हिसा उपलब्ध करून देणं हे त्यांचं काम आहे.’

पाक बोर्डाने बीसीसीआय बरोबरच आयसीसीकडेही याविषयी विचारणा केली आहे. पाक संघाबरोबरच रमीझ राजा आणि वसिम अक्रम हे पाक समालोचकही सध्या भारतात आहेत. पण, जवळ जवळ ६० मीडिया प्रतिनिधींना अजून भारताचा व्हिसा मिळालेला नाही. पाकिस्तानचा एक सामना पारही पडला आहे.(Ind vs Pak)

(हेही वाचा-Ramesh Bais : सर्वसाधारण पदवीपेक्षा कौशल्य विकासातील पदवीला अधिक महत्व)

विश्वचषक स्पर्धा आयसीसीकडून भरवली जाते. आणि यंदा भारत हा यजमान देश आहे. पण, पाकिस्तान हा देश भारताच्या पीसीआर वर्गात मोडत असल्यामुळे तिथून येणाऱ्या लोकांना व्हिसा देताना तीन यंत्रणांची परवानगी घ्यावी लागते. ही क्रीडास्पर्धा असल्यामुळे ही परवानगी गृह मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसंच क्रीड मंत्रालयाकडून यावी लागेल. त्यानंतर व्हिसा मान्य होऊ शकेल. अर्थात, भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय किंवा बीसीसीआयने याविषयी कुठलंही भाष्य किंवा स्पष्टीकरण दिलेलं नाही.

भारताचा पाकिस्तानबरोबरचा सामना (Ind vs Pak) येत्या १४ ऑक्टोबरला अहमदाबादेत होणार आहे. या सामन्याचं तिकीट हातात आहे. पण, भारतीय व्हिसा नाही अशाप्रकारची ट्विट पाकिस्तानात सोशल मीडियावर अधून मधून फिरत आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.