Ind vs Pak : कसा होता पाकिस्तान संघाचा अहमदाबादमधील पहिला दिवस?

हैद्राबादप्रमाणेच पाक संघाचं अहमदाबादमध्येही जल्लोषात स्वागत झालं.

107
Ind vs Pak : कसा होता पाकिस्तान संघाचा अहमदाबादमधील पहिला दिवस?
Ind vs Pak : कसा होता पाकिस्तान संघाचा अहमदाबादमधील पहिला दिवस?
  • ऋजुता लुकतुके

हैद्राबादप्रमाणेच पाक संघाचं अहमदाबादमध्येही जल्लोषात स्वागत झालं. तर विमानातही कर्मचाऱ्यांनी केक कापून पाकचा श्रीलंकेविरुद्‌धचा विजय साजरा केला. पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतीय आदरातीथ्याचा चांगला उपभोग सध्या घेत आहे. हैद्राबादमध्येही संघ राहत असलेल्या हॉटेलने त्यांचं जेवण आणि सराव यांची बडदास्त ठेवली होती. आता अहमदाबादमध्ये संघाचं जंगी स्वागत झालं. भारतीय चाहते आणि ते राहत असलेलं हॉटेल व्यवस्थापन अशा सर्वांनीच त्यांची मेहमाननवाजी करण्यात कसूर सोडलेली नाही. (Ind vs Pak)

हॉटेलमध्ये पाक संघाचं स्वागत त्यांच्यावर फुलाच्या पाकळ्या उधळून, रंगीबेरंगी फुगे हवेत सोडून तसंच ढोल-ताशांच्या आवाजात करण्यात आलं. खेळाडूंसाठी पारंपरिक नृत्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता आणि हॉटेलकडून खेळाडूंना विणलेले खास स्कार्फही देण्यात आले. (Ind vs Pak)

इतकंच नाही तर ज्या विमानाने पाक संघ अहमदाबादला आला त्या विमानातही संघासाठी खास सेलिब्रेशन करण्यात आलं. संघाने श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकला होता. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी विमान कर्मचाऱ्यांनी केक कापला आणि पाक खेळाडूंना खास खानाही खिलवला. (Ind vs Pak)

पाक क्रिकेट बोर्डानेही भारतात पाक संघाला मिळत असलेल्या आपलेपणाच्या वागणुकीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

(हेही वाचा – Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर सरन्यायाधीशांनी ओढले ताशेरे)

अर्थात, संघाभोवती अहमदाबादमध्ये कडक सुरक्षा बंदोबस्त असणार आहे. आणि पाक संघाला सुरक्षेतच फिरावं लागणार आहे. भारत – पाक सामन्याचा बंदोबस्त म्हणून अहमदाबाद शहरात ११,००० सुरक्षा सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

पाकिस्तानचा संघ २७ सप्टेंबरला भारतात आला आणि तेव्हापासून तो हैद्राबादला होता. तिथेही त्यांचं असंच स्वागत झालं होतं. विमानतळावर त्यांच्या स्वागताला भारतीय चाहते हजर होते. आणि उप्पल मैदानावर संघाच्या झालेल्या पहिल्या दोन्ही सामन्यांना भारतीय प्रेक्षकांनी गर्दी केली होती. तिथे बाबर आझम या पाक कर्णधाराला प्रेक्षकांचा पाठिंबाही मिळाला. (Ind vs Pak)

स्पर्धेत भारताची कामगिरी आतापर्यंत चांगली झाली आहे. त्यांनी नेदरलँड्स आणि श्रींलकेविरुद्धचे पहिले दोनही सामने निर्णायकरित्या जिंकले. यात श्रीलंकेविरुदध पाकने ३४४ धावांचा यशस्वी पाठलाग केला. सलामीवार शफिक तसंच महम्मद रिझवान यांनी आक्रमक शतकं ठोकली. पाकचे फलंदाज सध्या चांगल्या फॉर्मात आहेत. त्यामुळे भारत-पाक सामनाही रंगतदार होण्याची चिन्ह आहेत. (Ind vs Pak)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.