Ind Vs Pak : पाकिस्तानला सलग दुसरा झटका, बाबर आझम आणि इमाम आऊट

48
Ind Vs Pak : पाकिस्तानला सलग दुसरा झटका, बाबर आझम आणि इमाम आऊट
Ind Vs Pak : पाकिस्तानला सलग दुसरा झटका, बाबर आझम आणि इमाम आऊट

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy) स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामना होत आहे. दरम्यान, सुरूवातीला मोहम्मद शमीला गोलंदाजी करण्यात थोडी अडचण येत असल्याचे दिसून आले. या कारणास्तव त्याने मैदान सोडले. तर, हार्दिक पांड्याने भारताला पहिलं यश मिळवून दिलं आहे. बाबर आझमला 23 धावांवर हार्दिक पांड्याने तंबूत पाठवलं आहे. (IND vs PAK)

डावाच्या नवव्या षटकात 41 धावांवर पाकिस्तानला पहिला धक्का बसला. हार्दिक पांड्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाबरने चौकार मारला. यानंतर हार्दिक स्वतःवर रागावलेला दिसला. पुढच्याच चेंडूवर हार्दिकने बाबरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बाबरने 26 चेंडूत पाच चौकारांसह 23 धावा केल्या. तर पाकिस्तानला सलग दुसरा झटका सहन करावा लागला आहे. बाबर पाठोपाठ इमाम याला अक्षर पटेल ने तंबूत पाठवलं आहे. (IND vs PAK)

दुबईतील गेल्या 10 सामन्यांमधील आकडेवारी
दुबईत गेल्या 10 सामन्यांमध्ये टॉस जिंकून 7 वेळा पहिले फिल्डिंग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. दुबईत आतापर्यंत एकूण 58 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 35 सामन्यांत पहिले फिल्डिंग करणारी टीम जिंकली आहे. (IND vs PAK) त्यामुळे आकडेवारीनुसार, दुबईत टॉस जिंकून पहिले फिल्डिंग घेणाऱ्या संघाला विजयी होण्याची अधिक संधी आहे, असं म्हणू शकतो. दरम्यान टीम इंडियाने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळलेल्या 7 पैकी 6 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर फक्त एकदाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच टीम इंडियाने 6 पैकी 5 सामने हे विजयी धावांचा पाठलाग करताना जिंकले आहेत. (ICC Champions Trophy)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.