Ind vs Pak : ‘गरज पडल्यास संघात बदल करण्यासाठी तयार’ – रोहीत शर्मा

115
Ind vs Pak : ‘गरज पडल्यास संघात बदल करण्यासाठी तयार’ - रोहीत शर्मा
ऋजुता लुकतुके

अहमदाबादमध्ये आल्यापासून झालेल्या दोन सराव सत्रांनंतर कर्णधार रोहीत शर्माने संघात (Ind vs Pak) बदल करण्याची तयारी बोलून दाखवली आहे. नेमकं काय आहे रोहीतच्या मनात?

भारतीय संघाने (Ind vs Pak) चेन्नईतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात तीन फिरकी गोलंदाजांना खेळवलं. आणि त्याचा उपयोग असा झाला की, ऑस्ट्रेलियाची तगडी फलंदाजांची फळी असताना त्यांना १९९ धावांमध्ये रोखण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी झाले.

त्यानंतर अफगाणिस्तान विरुद्ध मात्र भारताने (Ind vs Pak) अश्विनच्या जागी शार्दूल ठाकूरला खेळवलं. आता पाकिस्तान विरुद्धच्या मोठ्या सामन्यात पुन्हा संघात बदल करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी रोहीतला विचारला असता त्याने ‘गरज पडल्यास ते ही करू,’ असं उत्तर दिलं आहे.

संघात अश्विन की शार्दूल?

संघासमोर अश्विन की शार्दूल (Ind vs Pak) हा पेच आहे हे नक्की. नाहीतर रोहीत असं अर्धवट बोलला नसता. ‘मैदानावर नेमकी परिस्थिती काय आहे, ते बघून आम्ही संघात एखाद दुसरा बदल करू शकतो. त्यात काही अडचण नाही. खेळाडूंनाही आम्ही संघातील बदलांविषयी वेळेवर माहिती दिलेली आहे. त्यांचा आक्षेप असण्याचं काही कारण नाही. खेळपट्टी आणि वातावरणाची मागणी तीन फिरकी गोलंदाजांची असेल तर आम्ही तसं करू,’ असं रोहीत म्हणाला.

(हेही वाचा – Ind vs Pak : भारत पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर का होतोय #BoycottIndoPak हा ट्रेंड?)

हा पेच त्याला वाटतोय कारण, खेळपट्टी (Ind vs Pak) फलंदाजीला पोषक आहे हे नक्की. अशावेळी आठव्या क्रमांकावर अश्विनला खेळवायचं की शार्दूलला हा त्याच्या आणि एकूणच संघ व्यवस्थापनासमोरचा प्रश्न आहे. दोघंही गोलंदाज पण, वेळ पडल्यास फटकेबाजीही करू शकणारे फलंदाज आहेत. शार्दूलकडे विकेट घेण्याची क्षमता आहे.

तर खेळपट्टी थोडा जरी चेंडू थांबून येणार असेल तर अशावेळी अश्विनचा ऑफ-ब्रेक उपयोगी पडू शकतो. त्यामुळे हा पेच (Ind vs Pak) संघासमोर निर्माण झाला आहे. भारतीय संघाचे अंतिम अकरा खेळाडू अर्थातच सामन्यापूर्वी अर्धा तास आधी नाणेफेकीच्या वेळी निश्चित होतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.