Ind vs Pak : भारत – पाक सामन्या दरम्यान अन्न घरपोच देणाऱ्या हॉटेलची चांदी. ‘या’ पदार्थाला होती सर्वाधिक मागणी 

भारत - पाक सामन्याचा आनंद सर्वानीच लुटला. आणि या दिवशी सामना बघण्याबरोबरच अनेकांनी पार्टीही आयोजित केली होती. यात सामन्याचं स्क्रिनिंग आयोजित करणारे मॉल आणि अन्नपदार्थ घरपोच देणारी हॉटेल मालामाल झाली 

152
Ind vs Pak : भारत - पाक सामन्या दरम्यान अन्न घरपोच देणाऱ्या हॉटेलची चांदी. ‘या’ पदार्थाला होती सर्वाधिक मागणी 
Ind vs Pak : भारत - पाक सामन्या दरम्यान अन्न घरपोच देणाऱ्या हॉटेलची चांदी. ‘या’ पदार्थाला होती सर्वाधिक मागणी 

ऋजुता लुकतुके

भारतात क्रिकेटच्या भोवती मोठी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. (Ind vs Pak ) महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी टीव्ही, एसी यांची विक्रीही वाढते. यंदाचा विश्वचषक आणि खास करून भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा सामना याला अपवाद नव्हता. १४ ऑक्टोबरला झालेल्या या सामन्या दरम्यान ऑनलाईन फूड डिलिव्हरी तसंच सामन्यांचं थेट प्रसारणचं स्क्रिनिंग करणाऱ्या कंपन्यांची यात चांदी झाली.

यावेळी स्विगी या अन्नपदार्थ घरपोच देणाऱ्या सेवेची उलाढाल तब्बल १,१०० टक्क्यांनी वाढली. या ॲपवर सगळ्यात जास्त मागणी यंदा होती ती बर्गरला. एरवी बिर्याणीची मागणी जास्त असते. पण, खास भारत – पाक सामन्याच्या दिवशी चिकन बर्गर सगळ्यात जास्त लोकांनी मागवले.

स्विगी कंपनीने भारत – पाक सामन्या दरम्यानच्या ऑनलाईन ऑर्डरची माहिती लोकांसमोर आणली आहे. आणि यात बर्गरला ‘डिश ऑफ द डे’ चा मान मिळाला आहे. त्या खालोखाल व्हेज पिझ्झा, व्हेज टाकोज आणि चोको लाव्हा केक यांना मागणी होती.

(हेही वाचा-Fastest Half Century by Indian : रेल्वेच्या आशुतोष शर्माने मोडला युवराज सिंगचा ‘हा’ विक्रम)

बिग स्क्रीनची जादू 

घरी बसून सामन्याची मजा लुटण्याबरोबरच अनेकांनी मोठया स्क्रीनवर सामन्याची मजा लुटण्याचा पर्यायही निवडला. अनेक थिएटर तसंच हॉटेलनी तशी सोय चाहत्यांसाठी उपलब्ध करून दिली होती. पीव्हीआर आयनॉक्स कंपनीने ४० शहरांमध्ये ११७ सिनेमागृहांमध्ये हा सामना पाहण्याची सोय करून दिली होती.

या सामन्याची २०,००० तिकिटं भारत भरात खपल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे. काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एकगठ्ठा तिकिटं खरेदी केल्याचंही आयनॉक्स कंपनीने जाहीर केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त शहरंच किंवा महानगरं नाही तर अगदी अमरावती आणि अकोल्यातही स्क्रिनिंगला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.

ऑनलाईन मागणी वाढली असताना प्रत्यक्ष हॉटेलमध्ये जाणाऱ्यांची संख्या खूपच कमी होती. (Ind vs Pak) त्यामुळे डाईन – इन हॉटेलना त्या दिवशी उलट तोटा सहन करावा लागला.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.