- ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषक स्पर्धेत सगळ्यांना उत्सुकता असेल ती पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याची. आणि या सामन्याच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये नसॉ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम उभं राहात आहे. या स्टेडिअमचं बांधकाम नेमकं कुठवर आलंय हे दाखवण्यासाठी आयसीसीने मंगळवारी या स्टडिअमचे काही व्हिडिओ आणि फोटो ट्विटवर पोस्ट केले आहेत. (Ind vs Pak T20 World Cup)
आणखी ३ महिन्यांनी म्हणजे ९ जूनला या स्टेडिअमवर भारत विरुद्ध पाकिस्तान असा टी-२० विश्वचषकाचा सामना रंगणार आहे. ही स्पर्धा १ जूनला सुरू होत आहे. (Ind vs Pak T20 World Cup)
The #T20WorldCup 2024 fever is gripping New York 😍
The Nassau County International Cricket Stadium celebrates its one-month construction milestone 🏟️
Details ➡ https://t.co/ldyYDpSA5C pic.twitter.com/SSQxrPIX0o
— ICC (@ICC) March 5, 2024
फक्त पाकिस्तानच नाही तर भारतीय संघ आपले साखळी गटातील सर्व सामने हे न्यूयॉर्कमध्येच खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी हे जवळ जवळ होम ग्राऊंडच असेल. आयर्लंड आणि अमेरिके विरुद्धच्या लढतीही इथेच होणार आहेत. नसॉ काऊंटी मैदानाचा ईस्ट स्टँड हा सगळ्यात मोठा असणार आहे. आणि इथं एकावेळी १२,५०० प्रेक्षक बसू शकतील. हा स्टँड आता चांगला आकार घेताना दिसतोय. तर मैदानाचं आऊटफिल्डही तयार होत आहे. (Ind vs Pak T20 World Cup)
Ready for the T20 World Cup in NYC? 👀
The Nassau County International Cricket Stadium in New York marked the one-month construction milestone 🏟
Details 👇https://t.co/reEeurZWXh
— ICC (@ICC) March 5, 2024
(हेही वाचा – Vanchit Bahujan Aghadi : वंचितच्या ‘त्या’ अटीमुळे मविआसोबत आघाडीची शक्यता मावळली)
‘नसॉ स्टेडिअमची उभारणी चांगल्या गतीने होत आहे. आणि न्यूयॉर्क शहरात क्रिकेटसाठी असं अद्ययावत स्टेडिअम उभारलं जात असल्याचा खूप आनंद होत आहे. जानेवारी महिन्यातच आऊटफिल्डचं काम सुरू झालं होतं. आणि ईस्ट स्टँडही आकार घेत आहे. पॅव्हेलिअनचं कामही हळू हळू सुरू होईल,’ असं आयसीसीचे स्पर्धा संचालक ख्रिस टेटली यांनी मीडियाशी बोलताना म्हटलं आहे. (Ind vs Pak T20 World Cup)
न्यूयॉर्कच्या नसॉ काऊंटी स्टेडिअमवर होणारे सामने पाहूया,
- ३ जून , श्रीलंका वि. द आफ्रिका
- ५ जून, भारत वि. आयर्लंड
- ७ जून, कॅनडा वि. आयर्लंड
- ८ जून, नेदरलँड्स वि. दक्षिण आफ्रिका
- ९ जून, भारत वि. पाकिस्तान
- १० जून, द आफ्रिका वि. बांगलादेश
- ११ जून, पाकिस्तान वि. कॅनडा
- १२ जून, भारत वि. अमेरिका
हेही पहा –
Join Our WhatsApp Community